महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mulayam Singh Yadav Death : मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर देशभरातील राजकीय नेत्यांकडून दु:ख व्यक्त - मुलायम सिंह यादव यांचे निधन

लखनौै उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन (Mulayam singh Yadav death) झाले. मुलायम सिंह यादव 82 वर्षांचे होते आणि दीर्घकाळ आजारी (Mulayam singh Yadav founder of Samajwadi Party) होते. त्याच्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेक नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

मुलायम सिंह
मुलायम सिंह

By

Published : Oct 10, 2022, 11:09 AM IST

Updated : Oct 10, 2022, 12:29 PM IST

मुंबई :लखनौै उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. मुलायम सिंह यादव 82 वर्षांचे होते आणि दीर्घकाळ आजारी (reaction on Mulayam sing Yadav death) होते. त्याच्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेक नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

सुप्रिया सुळे -माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. नेताजी आपल्या देशाने पाहिलेल्या सर्वात उंच समाजवादी नेत्यांपैकी एक होते. असे सुप्रिया सुळेंनी ट्विट केले.

देवेंद्र फडणवीस -उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी राम मनोहरजी लोहिया यांच्यासारख्या नेत्यांसोबत काम केले. उत्तर प्रदेशच्या राजकारणात दीर्घकाळ योगदान दिले. असे त्यांनी ट्विट केले.

समाजवादी पार्टी -एका ट्विटमध्ये, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांचे वडील आणि पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची घोषणा केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ज्येष्ठ राजकारणी मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले . ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की - मुलायम सिंह यादव हे एक तळागाळातील नेते होते. त्यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात अनेक दशके महत्त्वाची भूमिका बजावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी -पीएम मोदींनी समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायम सिंह यादव (Mulayam singh Yadav founder of Samajwadi Party) यांना श्रद्धांजली वाहिली. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की - ते 'आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे प्रमुख सैनिक' होते. त्यांचे संसदीय हस्तक्षेप अभ्यासपूर्ण होते. त्यांनी राष्ट्रीय हित पुढे नेण्यावर भर दिला होता.

अखिलेश यादव -एका ट्विटमध्ये, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांचे वडील आणि पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाल्याचे सांगितले. ल्या आठवड्यापासून त्यांच्यावर गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. असे ते ट्विटमध्ये म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह जी यांचे मोठे योगदान आहे. मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो ही प्रार्थना, असे ट्विट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाच्या बातमीने दु:ख झाले आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.मला वैयक्तिकरित्या मुलायमसिंहजींबद्दल खूप आपुलकी आहे, ई-रिक्षाचा निर्णय घेताना मुलायमसिंहजींचा भक्कम पाठिंबा होता. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबीयांना शक्ती देवो.

जयंत पाटील -मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक अध्याय बंद झाला. मातीचे पुत्र, त्यांनी लोहिया आणि जेपी यांच्या सोबत समाजवादी चळवळीचे नेतृत्व केले. पक्षपातळीवर आदरणीय, त्यांची बुद्धी आणि दृष्टी सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या सर्व संवेदना. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

Last Updated : Oct 10, 2022, 12:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details