पणजी (गोवा) -गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी परत भाजप नेते प्रमोद सावंत ( Re election Pramod Sawant Goa cm post ) यांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाला आहे. त्यानंतर आता राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता महत्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी लॉबिंग सुरू झाली आहे.
माहिती देताना भाजप नेते प्रमोद सावंत आणि इतर हेही वाचा -Love Horoscope 17 March : कोणत्या राशीवाल्यांना आजचा दिवस प्रणयासाठी आहे अनुकूल? जाणून घ्या लव्ह राशीफळ
ही नावे आहे चर्चेत
डॉ. सावंत यांच्यासोबत मंत्रिमंडळात डॉ. विश्वजीत राणे, निलेश काब्राल, मौविन गोडिन्हो, गोविंद गावडे, रोहन खवटे, सुभाष शिरोडकर, रवी नाईक, बाबुश मोंसरात यांच्यासोबत अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये, तसेच महाराष्ट्र वादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
दरम्यान डॉ. सावंत यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर रात्री उशिरा डॉ. सावंत गोव्यात दाखल झाले, यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या परिस्थितीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना टाळण्याचा प्रयत्न केला.
राणे आणि सावंत यांच्यात काहीही वाद नाही - प्रदेश अध्यक्ष
डॉ. सावंत यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतिश धोंड देखील दिल्लीतून गोव्यात दाखल झाले. दरम्यान तानावडे यांना डॉ. सावंत आणि विश्वजीत राणे यांच्या अंतर्गत वादविषयी विचारले असता सगळे आलबेल असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -Congress Introspection : पाच राज्यातील निवडणुकीच्या कामगिरीबाबत काँग्रेसचे आत्मपरीक्षण, 'या' नेत्यांची केली नियुक्ती