नवी दिल्ली :बँकेच्या रेपो रेटच्या दरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वात नेमलेल्या समितीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांवर ईएमआयचा कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त भार पडणार नसल्याचेही गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यावेळी स्पष्ट केले. भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्याकडे वाटचाल करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्राहकांवर पडणार नाही ईएमआयचा अतिरिक्त भार :भारतीय रिझर्व बँकेच्या समितीने वित्तिय वर्ष 2023 ते 2024 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील बँकेचा रेपो रेट जाहीर केला आहे. हा रेपो रेट 6.5 टक्के असल्याचे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले. भारतीय अर्थव्यवस्था मजबुतीकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. रेपो रेट स्थिर असल्याने ग्राहकांच्या ईएमआयवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसल्याचेही शक्तीकांत दास यांनी यावेळी सांगितले. रिझर्व बँकेच्या मुद्रा धोरण समितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती शक्तीकांत दास यांनी यावेळी दिली. मुद्रा धोरण समितीने रेपो रेटच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतल्याचे शक्तीकांत दास यावेळी म्हणाले.