महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना संबंधित आरोग्य सुविधांसाठी आरबीआयकडून 50 हजार कोटींची तरतूद - healthcare services

आरबीआईने मार्च 2022 पर्यंत कोविड-19 संबंधित आरोग्य सुविधासाठी 50,000 कोटी रुपयांची विशेष लिक्विडिटी सुविधांची घोषणा केली.

कोरोना संबंधित आरोग्य सुविधांसाठी आरबीआयकडून 50 हजार कोटींची तरतूद
कोरोना संबंधित आरोग्य सुविधांसाठी आरबीआयकडून 50 हजार कोटींची तरतूद

By

Published : May 5, 2021, 1:42 PM IST

नवी दिल्ली -कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत भारतीय रिझर्व बँकने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी कोरोना आणि त्यासंबंधित परिस्थिती संदर्भात पत्रकार परिषद घेतली. कोरोना लच्या दुसऱ्या लाटेने भारताची अर्थव्यवस्था खूपच प्रभावित झाली आहे. या घटनांकडे भारतीय रिझर्व बँके लक्ष ठेवून असल्याचेही दास यांनी सांगितले. कोरोनाच्या या लाटेविरोधात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मोठी पावले उचलावी लागणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेवर संकट

शक्तिकांत दास पुढे म्हणाले की, भारतीय रिझर्व बँक कोरोनाच्या सध्याच्या स्थितीवर लक्ष ठेवून राहील. विशेष करून नागरिक व्यापारी संस्था आणि दुसऱ्या लाटेत प्रभावित झालेल्या संस्थासाठी आरबीआयच्या आपल्याकडील सर्व संसाधनाचा वापर करेल. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा दिसून येत होती, मात्र दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेवर संकट निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.

लस निर्मिती, आरोग्य सुविधासाठी कर्जपुरवठा-

आरबीआईने मार्च 2022 पर्यंत कोविड-19 संबंधित आरोग्य सुविधासाठी 50,000 कोटी रुपयांची विशेष लिक्विडिटी सुविधांची घोषणा केली. या माध्यमांतून बँक लस निर्माण कंपन्या , लास वाहतूक, पुरवठादार यांना सहजपणे कर्ज उपलब्ध केले जाईल. याशिवाय रुग्णालये आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्था यांनाही याचा लाभ मिळणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details