पुरी ( ओडिशा ) :पुरी- ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांची रथयात्रा महोत्सवाला सुरुवात झाली ( Ratha Yatra 2022 ) आहे. जवळपास आठवडाभर जगन्नाथ यात्रेचा महोत्सव असतो. महोत्सवासाठी देश-विदेशातून लाखो भाविक हजेरी लावतात. भगवान श्रीकृष्ण, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या पूजेनंतर जगात प्रसिद्ध असलेली रथयात्रा काढण्यात येते. दोन वर्षांच्या खंडानंतर भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांच्या नऊ दिवसांच्या रथयात्रेला आजपासून पूर्ण लोकसहभागाने सुरुवात झाली आहे.
३ वेगवेगळे रथ : आज जगन्नाथ रथ यात्रेचा पहिला दिवस आहे. मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भक्त भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे ३ वेगवेगळे रथ ओढतात. भाविक जवळपास ३ किलोमीटर लांब असलेल्या गुंडीचा मंदिरापर्यंत रथ ओढतात. कोविड-19 साथीच्या आजारामुळे, 2020 आणि 2021 मध्ये उत्सवादरम्यान भाविकांना पवित्र नगरात प्रवेश नाकारण्यात आला होता.