आगरतळा : त्रिपुरामधील उनाकोटी येथील कुमारघाट येथे बुधवारी रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. उनाकोटी येथील चौमुहनी परिसरातून जाणऱ्या रथ यात्रेचा उच्च दाब असलेल्या विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्याने शॉक लागून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
इतक्या लोकांचा मृत्यू : या रथ यात्रेसाठी शेकडो भाविक उपस्थित होते. रथ यात्रेच्या मिरणवणुकीदरम्यान ही दुर्घटना झाल्याने भाविकांमध्ये गोंधळ उडला. मिळालेल्या माहितीनुसार, उनाकोटी येथील चौमुहनीमध्ये रथयात्रा काढण्यात आली होती. या रथामध्ये साधरण 20 लोक बसले होते. रथ चालू असताना या रथावर एक उच्च दाब असलेली विद्युत वाहक तार पडली. यामुळे विजेचा धक्का लागून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची सांगण्यात येत आहे. पण याची अधिकृत माहिती कोणी दिलेली नाही. हाती आलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 22 वर पोहोचली असल्याची चर्चा परिसरात आहे.
काय म्हणाले पोलीस :दरम्यान पोलिसांकडून या बाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. एसडीपीओ कुमारघाट कमल देबबर्मा यांनी ईटीव्ही भारत या प्रकरणाची माहिती दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही.