महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rat Eats up Woman Eyelashes : अक्षम्य हलगर्जीपणा.. सरकारी रुग्णालयात उंदराने खाल्ल्या अर्धांगवायू झालेल्या महिलेल्या पापण्या!

- मेडिकल कॉलेजच्या महाराव भीमसिंग रुग्णालयाती आयसीयूमध्ये ( Government Hospital Negligence in Kota ) अर्धांगवायू झालेल्या महिलेवर उपचार सुरू होते. या महिला रुग्णाच्या पापण्या उंदराने खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार ( Rat eats up Paralysed woman Eyelashes ) घडला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याचा ( ICU of Maharao Bhimsingh Hospital  ) प्रयत्न करत आहे. आयसीयूमध्ये उंदीर नाही, असा रुग्णालय व्यवस्थापनाने दावा केला आहे.

सरकारी रुग्णालयात उंदराने खाल्ल्या अर्धांगवायू झालेल्या महिलेल्या पापण्या
सरकारी रुग्णालयात उंदराने खाल्ल्या अर्धांगवायू झालेल्या महिलेल्या पापण्या

By

Published : May 17, 2022, 7:06 PM IST

कोटा ( जयपूर ) - राजस्थानचे वैद्यकीय मंत्री परसादी लाल मीना ( Rajasthan Medical Minister Parsadi Lal Meena ) कोटा रुग्णालयांमधील व्यवस्था सुधारण्याचा दावा करतात. सरकारी रुग्णालयांसाठी कोटयवधींचा निधी मंजूर झाल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात रुग्णालयात उलट परिस्थिती आहे. कोटामधील सरकारी रुग्णालयात ( government hospital in Kota ) उंदराने अर्धांगवायू झालेल्या महिलेच्या ( rats ate the eyelids of a paralyzed woman ) पापण्या खाल्ल्या. या घटनेने आरोग्य यंत्रणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारी रुग्णालयाचा निष्काळजीपणा- मेडिकल कॉलेजच्या महाराव भीमसिंग रुग्णालयाती आयसीयूमध्ये ( Government Hospital Negligence in Kota ) अर्धांगवायू झालेल्या महिलेवर उपचार सुरू होते. या महिला रुग्णाच्या पापण्या उंदराने खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार ( Rat eats up Paralyzed woman Eyelashes ) घडला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याचा ( ICU of Maharao Bhimsingh Hospital ) प्रयत्न करत आहे. आयसीयूमध्ये उंदीर नाही, असा रुग्णालय व्यवस्थापनाने दावा केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे, आयसीयूमध्ये उंदीर असल्याचा दावा महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

सरकारी रुग्णालयात उंदराने खाल्ल्या अर्धांगवायू झालेल्या महिलेल्या पापण्या

२८ वर्षीय रुग्ण बोलू शकत नाही - मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील २८ वर्षीय रुपवती या गेल्या ४६ दिवसांपासून एमबीएस रुग्णालयाच्या न्यूरो स्ट्रोक युनिटमध्ये दाखल आहेत. त्याचे संपूर्ण शरीर अर्धांगवायू झाले आहे. त्या शरीराचा कोणताही भाग हलवू शकत नाही. तसेच त्यांना बोलता येत नाही. महिलेचे पती देवेंद्र सिंग भाटी यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी ३ वाजता ते पत्नीजवळ आयसीयूमध्ये होते. उजव्या डोळ्याच्या पापण्यांवर उंदीराने कुरतडे. त्यांच्या बायकोने थोडावेळ मान हलवली. मग ती झोपी गेली. डोळ्यातून रक्त टपकत असल्याचे पाहून त्यांनी यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांनी नेत्ररोग विभागाच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचाराबाबत सांगितले. गरज पडल्यास डोळ्याची शस्त्रक्रियाही केली जाईल, असेही सांगितले.

सरकारी रुग्णालयात उंदराने खाल्ल्या अर्धांगवायू झालेल्या महिलेल्या पापण्या

रुग्णालय व्यवस्थापनाचा अजब तर्क- एमबीएस रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. समीर टंडन यांनी सांगितले की, न्यूरो स्ट्रोक आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णाला उंदीर चावला की नाही, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यात रुग्णालय व्यवस्थापनाचा दोष आहे की आणखी कोणी याचाही तपास करेल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. रुग्णाच्या नातेवाईकांनाही आयसीयूमध्ये प्रवेश आहे. अशा परिस्थितीत जेव्हा ते तिथे उपस्थित होते, तेव्हा त्यांच्यावरही जबाबदारी होती. यात आमची चूक आहे, असे म्हणता येणार नाही. यासंदर्भात प्रभाग प्रभारी आणि प्रभारींकडूनही अहवाल मागवण्यात आला आहे. त्यांचा निष्काळजीपणा समोर आल्यास चौकशी केली जाईल, उपअधीक्षकांनी सांगितले.

नातेवाइकांनी सांगितले उंदीर फिरतात- एमबीएस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.नवीन सक्सेना यांनी फोनवरील संभाषणात सांगितले की, त्यांनी पेस्ट कंट्रोल प्रोग्राम केला आहे. तरीही उंदीर कसे आले? यासंदर्भातही चौकशी करण्यात येणार आहे. कीटकनाशक नियंत्रणात कोणतीही कमरतरा राहणार नाही, हेही पाहिले जाईल. याच न्यूरो स्टॉक युनिटच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, आयसीयूमध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर आहेत. हे उंदीर फिरत असतात.

हेही वाचा-डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीला गमवावा लागला हाताचा तळवा; 20 वर्षानंतर 16 लाखांची भरपाई देण्याचे तेलंगाणा ग्राहक आयोगाचे आदेश

हेही वाचा-डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीला गमवावा लागला हाताचा तळवा; 20 वर्षानंतर 16 लाखांची भरपाई देण्याचे तेलंगाणा ग्राहक आयोगाचे आदेश

हेही वाचा-Inflation hit a record high : धान्य, इंधनाच्या किमती वाढल्यामुळे महागाई 15.08% च्या विक्रमी उच्चांकावर

ABOUT THE AUTHOR

...view details