रांची - चारा घोटाळ्याशी संबंधित डोरंडा कोषागारातून पैसे काढल्याप्रकरणी दोषी ठरलेले लालू प्रसाद यादव यांची आज गुरुवार(दि. 28 एप्रिल)रोजी जामिनावर तुरुंगातून सुटका होणार आहे. (Lalu Released on Bail Today) बुधवारी उच्च न्यायालयाकडून जामीनाचा आदेश दिवाणी न्यायालयात पाठवण्यात आला. लालू प्रसाद यादव यांचे वकील प्रभात कुमार यांनी आज जामीनपत्र भरले असून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची दुपारपर्यंत तुरुंगातून जामिनावर सुटका होणार आहे.
लालू प्रसाद यांना डोरंडा प्रकरणात दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावला होता. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांना १० लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. (Doranda case to Lalu Prasad) जे जामीन बाँड प्रक्रियेदरम्यान जमा करण्यात आला आहे. अंजल किशोर सिंग हा या खटल्यात जामीनदार आहे. रिलीझ ऑर्डर जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता येथून बिरसा मुंडा कारागृहात सुटकेचा आदेश पाठवण्यात आला आहे.
अधिवक्ता प्रभात कुमार यांनी सांगितले की, लालू प्रसाद यादव यांना 42 महिन्यांची शिक्षा झाली असून सध्या त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत, तर लालूप्रसाद यादव यांना एम्समधून डिस्चार्ज मिळणार की नाही, हे पूर्णपणे एम्सच्या डॉक्टरांवर अवलंबून आहे. लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात (1996 ते 2022)पर्यंत एकूण 42 महिने तुरुंगवास भोगला आहे.