मेष:चंद्र तूळ असून सातव्या घरात असणार आहे. प्रियजनासह मित्रांसोबत आजचा दिवस मजेत जाईल. नवीन कपडे आणि दागिने खरेदी करण्याकरिता आजचा दिवस चांगला आहे. सामाजिकदृष्ट्या तुमचा सन्मान होईल. मात्र, दुपारनंतर तुम्हाला संयमी वर्तन करावे लागणार आहे. खर्च जास्त होईल. नुकसान करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा.
- वृषभ:चंद्र तूळ राशीत असताना सहाव्या घरात असणार आहे. तुम्हाला व्यवसायासाठी आजचा दिवस फायदेशीर असेल. कौटुंबिक वातावरण सुख-शांतीचे आणि जुने मतभेद मिटविणारे असेल. विरोधकांवर विजय मिळाल्यानं समाधानकारक दिवस असेल. नोकरदार लोकांना सहकाऱ्यांची विशेष मदत मिळेल. भागीदारीच्या कामात सावधगिरीनं काम करावे लागेल.
- मिथुन: चंद्र तूळ राशीत चव्या घरात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवीन काम लगेच सुरू करू नका. दुपारनंतर घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहील. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध चांगले असणार आहेत. व्यवसायात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्यानं आर्थिक लाभ होईल. कामात यश मिळेल.
कर्क: चंद्र तूळ राशीत असताना चौथ्या घरात चंद्र असेल. निराशेमुळे तुम्ही थोडे चिंतेतअसल्यानं शारीरिकदृष्ट्या अस्वस्थता जाणवले. कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. अशा स्थितीत प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. जमीन आणि वाहनांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दुपारनंतर सुख-शांतीचा अनुभव घ्याल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आज तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप विचार कराल. कामाच्या ठिकाणी गैरसोय टाळण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा सल्ला राहिल.
- सिंह: चंद्र तुळा राशीत असताना तिसऱ्या घरात असेल. आज व्यवसाय किंवा नोकरीसाठी छोटा प्रवास होऊ शकतो. भागीदारीच्या कामात तुम्हाला फायदा होईल. नवीन कामासाठी वेळ चांगला आहे. तुम्ही काही फायदेशीर गुंतवणुकीत रस घेऊ शकता. काही काळ मानसिक निराशा अनुभवाल. शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कुटुंब आणि मालमत्तेशी संबंधित समस्या निर्माण होतील.
कन्या: चंद्र तूळ राशीत असताना दुसऱ्या घरात असेल. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना संयम ठेवा. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडं आज दुर्लक्ष करणं टाळा. भावांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत होईल. प्रेम जीवनात गोडवा राहील. तथापि, आरोग्याच्या दृष्टिकोनातून वेळ मध्यम आहे. आज तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबाबत संभ्रम निर्माण होईल. कोणतेही नवीन काम सुरू करणं टाळा. बहुतेक वेळा शांत राहा, यामुळे वाद टाळता येतील.
तूळ: चंद्र तूळ राशीत असताना तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. विचारांमध्ये दृढता राहील. नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. नवीन कपडे, दागिने किंवा मनोरंजनावर पैसा खर्च होईल. दुपारनंतर कोणताही निर्णय घेणे तुम्हाला कठीण जाईल. सहकाऱ्यांशी वाद टाळा. अहंकार बाजूला ठेवून खेळीमेळीच्या वातावरणात काम करा. आज तुमच्या सर्जनशीलतेने तुम्ही कोणतेही अवघड काम सहजतेने पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.