महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Horoscope today : या राशीचे लोक प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकतील, वाचा आजचे भविष्य

30 डिसेंबर 2022 रोजी जन्मकुंडलीतील आजच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या. कसा असेल तुमचा आजचा दिवस, कशी राहील नोकरी, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर ग्रहस्थिती! तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ई टिव्ही' भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य. 30 डिसेंबर 2022 . HOROSCOPE FOR THE DAY 30 DECEMBER 2022 . Today Rashi Bhavishya.

Today Rashi Bhavishya
आजचे भविष्य

By

Published : Dec 30, 2022, 5:40 AM IST

या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट नोव्हेंबरच्या दैनिक कुंडलीत. 30 डिसेंबर 2022. HOROSCOPE FOR THE DAY 30 डिसेंबर 2022. 30 DECEMBER 2022. Today Rashi Bhavishya.

ARIES मेष : आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. आर्थिक गुंतवणूक करू शकाल. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल. आर्थिक देवाण - घेवाण करताना सावध राहावे. गूढ विषयांकडे कल होईल. लोभाच्या लालसे पासून दूर राहा. निर्णयशक्तीच्या अभावाने द्विधा मनःस्थिती होईल.

TAURUS वृषभ : आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार व प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबीय व मित्र यांच्यासह आनंदात राहू शकाल. नवे संबंध व नवे परिचय व्यापारात लाभप्रद होतील. लहानसा प्रवास आनंददायी होईल. आजचा संपूर्ण दिवस उल्हास व प्रसन्नतेने भरलेला असेल.

GEMINI मिथुन :आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे. स्नेहीजनांकडून भेटवस्तू मिळतील. आरोग्य उत्तम राहील. प्रापांचिक जीवन आनंदपूर्ण राहील.

CANCER कर्क : आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण मंगल कार्य व परोपकारी कामात जास्त वेळ घालवाल. एखादा प्रवास संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न राहाल. नशिबाची साथ मिळेल. घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवाल. विदेश यात्रेची संधी लाभेल. नोकरदारांना लाभ होईल.

LEO सिंह : आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीसाठी खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. कुटुंबियांशी मतभेद होतील. अवैध कामामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे. योग्य मार्गदर्शन मिळविण्यासाठी प्रयत्न करा.

VIRGO कन्या : आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान - प्रतिष्ठा वाढेल. भागीदारांशी संबंध सलोख्याचे राहतील. उत्तम भोजन, वस्त्रालंकार व वाहनप्राप्ती होईल.

LIBRA तूळ : आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरात आनंद व शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश व सफलता मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या येतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. सहकारी व हाताखालचे नोकर यांचे सहकार्य लाभेल.

SCORPIO वृश्चिक : आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र - मैत्रिणी भेटतील. स्त्रियांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील.

SAGITTARIUS धनू :आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल. कल्पना जगात विहार कराल. प्रिय व्यक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाईल. तार्किक व बौद्धिक चर्चे पासून शक्यतो दूर राहा.

CAPRICORN मकर :आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांशी मतभेद होतील. छातीत वेदना होतील. शांत झोप मिळणार नाही. सामाजिक मानहानी होण्याची शक्यता आहे. वाणी संयमित ठेवावी लागेल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. मनःस्ताप व प्रतिकूल वातावरणामुळे दिवस कटकटीचा जाईल.

AQUARIUS कुंभ : आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल व त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. मित्र व नातेवाईक भेटतील. छोटया प्रावसाचे बेत आखाल. नशिबाची साथ लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

PISCES मीन :आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आनंद, उत्साह व प्रसन्न तन - मन ह्यामुळे आज चैतन्य व स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनःस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवावा. कुटुंबीयांसह मिष्ठान्नाचा आस्वाद घ्याल. प्रवास होईल. दांपत्य जीवन आनंदी राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details