तिरुपती :डक्किली मंडलच्या आंबेडकर नगरमधील एक व्यक्ती टिक-टॉक ( Tik Tokker ) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अत्यंत सक्रीय होती. तो सातत्याने आपले व्हिडिओ अपलोड करीत असे. ते पाहून विशाखापट्टणममधील एक टिक टॉकर ( Tik Tokker ) महिला त्याच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
Love triangle एका टिक टॉकरने केला दोन टिक टॉकर तरुणींशी विवाह, तिरुपतीमधील घटना
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील डक्किली मंडलमध्ये एका व्यक्तीने एकाचवेळी दोन तरुणींशी विवाह केल्याची अनोखी घटना घडली आहे. या दोघीही टिक टॉकर ( Tik Tokker ) असून दोघींच्या संमतीने त्याने हा विवाह केला आहे. विशेष म्हणजे हे तिघेही टिक टॉकर ( Tik Tokker ) आहेत.
मात्र, नियतीच्या मनात बहुदा वेगळेच काही होते. या व्यक्तीने कडप्पा येथील अन्य एका टिक-टॉकर ( Tik Tokker ) महिलेशी विवाह केला. प्रथम प्रेमात पडलेली महिला जेव्हा या व्यक्तीला भेटण्यासाठी त्याच्या घरी आली तेव्हा तिला त्याचे लग्न झाल्याचे कळाले आणि तिला खूप दुःख झाले. तिच्या गालावरून अश्रू ओघळले. मात्र लग्न झालेल्या त्या व्यक्तीच्या पत्नीला जेव्हा तिची कहाणी कळाली तेव्हा तिलाही वाईट वाटले. आपल्या पतीशी विवाह करण्याचा तुझा अधिकार होता, असे सांगत ती विशाखापट्टणममधील युवतीला म्हणाली की, तुला न्याय मिळायला हवा.
पहिल्या पत्नीने सांगितले की, आपण दोघी टिक टॉकर आहोत आणि एकमेकींसोबत एका छताखाली राहू शकतो. त्यामुळे तू देखील माझ्या पतीसोबत विवाह करू शकते. दोघींनी आपल्या पतीला ही बाब सांगितली. पती म्हणाला की, तुम्हाला दोघींना हरकत नसेल आणि एकमेकींशी जुळवून घेऊ शकत असाल तर माझी काही हरकत नाही. अखेर त्याने विशाखापट्टमण येथील युवतीशीही आपल्या पहिल्या पत्नीसमोरच जीवनगाठ बांधली. काही जण याला विडंबना म्हणत आहेत, तर काहींनी पहिल्या पत्नीला मोठ्या मनाची म्हटले आहे.