महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

डायनासोरचे दुर्मीळ अंडे: मध्य प्रदेशात सापडले डायनासोरचे दुर्मीळ अंडे, आकार दहापट मोठा - dhar latest news

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात दुर्मीळ डायनासोरचे अंडे सापडले आहे. त्या अंड्याच्या आत एक अंडे आहे. इतिहासात प्रथमच आढळलेल्या अशा अंड्याच्या अभ्यासातून डायनासोरच्या पुनरुत्पादनाची माहिती मिळणे अपेक्षित आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

डायनासोरचे दुर्मीळ अंडे
डायनासोरचे दुर्मीळ अंडे

By

Published : Jun 15, 2022, 10:02 AM IST

धार -मध्य प्रदेशात सापडलेली एका अनोख्या डायनासोरची अंडी सध्या चर्चेचा विषय आहे. ही अंड दिल्ली विद्यापीठाच्या संशोधकांच्या टीमने शोधून काढली. ज्यामध्ये एका अंड्याच्या आत दुसरे अंडे सापडले आहे. (Rare Dinosaur Egg)

मध्यप्रदेशात सापडले डायनासोरचे अंड्यात अंडे - मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील डायनासोर जीवाश्म राष्ट्रीय उद्यानात लागलेल्या शोधात ही अंडी टायटॅनोसॉरची सापडली आहेत. जी सौरोपॉड डायनासोरची एक प्रजाती आहे. हा शोध दिल्ली विद्यापीठाच्या जर्नल-सायंटिफिक रिपोर्ट्सच्या नवीन आवृत्तीत प्रकाशित करण्यात आला आहे, ज्याचे शीर्षक आहे "फर्स्ट ओव्हम-इन-ओवो पॅथॉलॉजिकल टायटॅनोसॉरिड एग थ्रो लाइट ऑन द रिप्रॉडक्टिव बायोलॉजी ऑफ सॉरोपोड डायनासोर". डायनासोरच्या अंड्यांमध्ये अंडी असण्याची दुर्मीळ घटना शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच आढळली आहे. सामान्यतः हे फक्त पक्ष्यांमध्ये आढळते. परंतु सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत हे डायनासोरचे पहिले प्रकरण आहे त्यामुळे ते दुर्मीळ आहे.

अंडी सामान्यपेक्षा 10 पट मोठी - संशोधकांच्या टीमला 10 अंडी असलेले सॉरोपॉड डायनासोरचे घरटे देखील सापडले आहे. ज्यामध्ये असामान्य अंड्यांचा समावेश आहे. त्यामध्ये दोन नियमित आणि गोलाकार अंड्याचे थर होते. जे मोठ्या फरकाने भिन्न आहेत. ते ओव्हम-इन-ओवो असलेल्या पक्ष्यांचे वैशिष्ट्य आहेत. अर्थात एक अंड्याच्या आत आणखी एक अंडे. त्याच घरट्यातील अंडी तसेच शेजारील अंड्याच्या सूक्ष्म रचनेने ते टायटॅनोसॉरिड सॉरोपॉड डायनासोर असल्याचे लक्षात आले आहे. डायनासोरचे प्रजनन कार्य कासव आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणेच असते, असे यापूर्वीच्या संशोधनात म्हटले आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details