महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rape On 10 Month Old Girl In UP; 10 महिन्याच्या चिमुरडीवर नोकराने केला बलात्कार - Rape On 10 Month Old Girl In UP

लखनऊ (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरातील सादतगंज भागात एका 10 महिन्याच्या बालिकेवर नोकराने बलात्कार (10 month old baby girl raped in uttarpradesh) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बालिकेवर अत्याचार झाल्याने नाजूक अंगांना जबरदस्त हानी झाली आहे. किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात शस्त्रक्रियेसाठी चिमुरडीला दाखल करण्यात आले आहे, वृत्त आयएएनएस या संस्थेने ट्वीट करून सांगितले आहे.

raped on 10 month old baby girl in up
Rape On 10 Month Old Girl In UP; 10 महिन्याच्या चिमुरडीवर नोकराने केला बलात्कार

By

Published : Nov 16, 2021, 3:54 PM IST

Updated : Nov 16, 2021, 6:01 PM IST

लखनऊ (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरातील सादतगंज भागात एका 10 महिन्याच्या बालिकेवर नोकराने बलात्कार (10 month old baby girl raped in uttarpradesh) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बालिकेवर अत्याचार झाल्याने नाजूक अंगांना जबरदस्त हानी झाली आहे. किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात शस्त्रक्रियेसाठी चिमुरडीला दाखल करण्यात आले आहे, वृत्त आयएएनएस या संस्थेने ट्वीट करून सांगितले आहे.

आयएएनएस या संस्थेचे ट्वीट

नोकरविरूद्ध गुन्हा दाखल -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाक घरात आई काम करत असताना रुममध्ये खेळत असलेल्या 10 महिन्याच्या मुलीवर नोकराने बलात्कार केल्याची ही धक्कादायक घटना लखनऊ येथील सादतगंज भागात रविवारी घडली आहे. मुलीचा जोरजोराने रडण्याचा आवाज रुममधून येत असल्याने आई स्वयंपाक घरातून धावत रूमकडे केली त्यावेळी घरीतील नोकर तिला अक्षेपार्ह स्थितीत आढळून आला. आईने त्या नोकराला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र आईला हिसका देऊन तो नोकर घरातून पळून गेला. या घटनेची माहिती घरच्यांना मिळताच त्यांनी सादतगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि नोकराविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आपली सुत्रे फिरवून आरोपीला तत्काळ अटक केली. पोलिसांनी सन्नी (आरोपी) विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत तसेच विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचा -धक्कादायक! शेजारी राहणाऱ्या २० वर्षीय नराधमाचा ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

Last Updated : Nov 16, 2021, 6:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details