सीतामढी (बिहार): बिहारच्या सीतामढीमध्ये एका 12 वर्षाच्या मुलाने स्मार्टफोनवर ब्ल्यू फिल्म्स पाहून अत्यंत घृणास्पद कृत्य केले. आरोपी मुलालाल अटक करून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात आहेत. सध्या ४ वर्षीय पीडित मुलगी रुग्णालयात दाखल आहे. मेडिकल चाचणीनंतर कोर्टात जबाब नोंदवला जाईल. या घटनेनंतर परिसरातील लोक हादरले आहेत. हा प्रकार आजकालच्या पालकांना विचार करायला लावणारा आहे.
खेळत असताना मुलीवर बलात्कार : नानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. २१ फेब्रुवारीला इयत्ता सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलाने बाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी ही तिच्या आजीच्या घरी गेली होती. रक्तबंबाळ अवस्थेत तिने तिच्या कुटुंबीयांना आपला त्रास सांगितला तेव्हा सर्वजण अस्वस्थ झाले. यानंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर आजीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली : तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. घाईगडबडीत पोलिसांनी आरोपी मुलाला सोबत नेले. तेथून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. 12 वर्षीय आरोपी मुलाने बलात्कारात आपला सहभाग मान्य केला आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून ब्लू फिल्म पाहिल्यानंतर हे कृत्य केल्याचे सांगितले. आरोपी अल्पवयीन मुलाला त्याच्या घरातून पकडून चौकशी करण्यात आली. त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पीडितेच्या आजीच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पीडितेचा जबाब कोर्टात नोंदवला जाईल, असे नानपूर पोलिस ठाण्याचे प्रमुख राकेश रंजन झा यांनी सांगितले.