बांदा (यूपी) : उत्तर प्रदेशातील बांदा (Rape eight years old girls Banda UP) येथे आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. येथील एका मुलीवर तिच्याच शेजारच्या तरुणाने (Neighbour youth man raped minor girl Banda UP ) बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर अनेक तास चिमुरडी बेशुद्ध पडली होती. घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी तरुणाचा शोध सुरू केला. (UP Banda minor girl rape) (Latest Crime News from UP)
मुलीला तोंड दाबून झुडपात नेले -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण शहर कोतवाली परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांची मुलगी सायंकाळी उशिरा घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने मुलीला तोंड दाबून जवळच्या झुडपात नेले. या तरुणाने येथे त्यांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.