महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rape in Agra : भयंकर! अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार; तक्रार केल्यानं गरम चिमट्यानं जाळले पीडितेचे हात - अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

Rape in Agra : उत्तर प्रदेशातील आग्रा इथं एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी पीडित कुटुंबानं दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Rape in Agra
संग्रहीत छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 10:00 AM IST

चौकशी करून लवकरच कायदेशीर कारवाई

लखनौ ( आग्रा) Rape in Agra : उत्तर प्रदेशातील आग्रा इथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. न्यू आग्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजाऱ्यानं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केलाय. तसंच आरोपीनं अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवला. याविरोधात मुलीनं तक्रार केल्यानंवर आरेपीनं घरात घुसून मुलीचा हात गरम चिमट्यानं जाळला.

शेजाऱ्यानं केला अत्याचार : याप्रकरणी अल्पवयीन विद्यार्थीनीच्या वडिलांनी मंगळवारी डीसीपी सूरज राय यांच्याकडं तक्रार केली. पीडितेच्या वडिलांनी डीसीपींना सांगितले की, ते न्यू आग्रा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवाशी आहेत. त्यांची मुलगी शाळेत जात असताना शेजारी राहणाऱ्या आशूनं विनयभंग केला. ती मुलगी शांतपणे हा त्रास सहन करत होती. मात्र 14 ऑगस्ट रोजी शेजारी आशूनं त्याची मुलगी शाळेत जात असताना तिचं अपहरण केलं. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसंच तिचा अश्लिल व्हिडिओही बनवला. याला विरोध केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर तो मुलीला शाळेबाहेर सोडून पळून गेला.

तक्रार केल्यास अ‍ॅसिड फेकण्याची धमकी : आरोपीनं मुलीवर अनेकवेळा बलात्कार केला. व्हिडिओद्वारे तिला ब्लॅकमेल केलं. यानंतर भीतीपोटी मुलीनं शाळेत जाणं बंद केलं. एका दिवशी घरी कोणी नसताना आरोपीनं घरात घुसून मुलीला धमकावलं. मुलीनं त्याला विरोध केला तेव्हा त्यानं चिमटे गरम करून मुलीच्या हातावर चटके दिले. तसंच तक्रार केल्यास चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकीही दिली. आरोपीच्या या कृत्यामुळं संपूर्ण कुटुंब भयभीत झाल्याचं पीडितेच्या वडिलांनी सांगितलंय.

गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश : अल्पवयीन विद्यार्थ्याच्या वडिलांनी आपल्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केलीय. याशिवाय आरोपींकडून कुटुंबीयांना धमक्याही दिल्या जात आहेत. न्यू आग्रा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी करून लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती डीसीपी सिटी सूरज राय यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. Minor Girl Gang Rape : मित्रानंच केला घात; चिमुरडीवर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, चार जणांना अटक
  2. Agra Crime News : गावातील तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  3. Procession of Woman : चपलेचा हार घालून महिलेची काढली धिंड; पीडिता रुग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details