जयपूर (राजस्थान) : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या तरुणाला त्याच्या वंशवृद्धीसाठी पॅरोलवर सोडण्याचे आदेश (Orders to release on parole to increase dynasty) राजस्थान उच्च न्यायालयाने (Rajasthan Highcourt order) दिले आहेत. न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठाने आरोपी राहुलने पत्नीमार्फत दाखल केलेली पॅरोल याचिका स्वीकारताना हा आदेश दिला. (Rape convict ordered to released on parole)
आरोपीची तरुण पत्नी अपत्यहीन - या प्रकरणातील आरोपीची तरुण पत्नी अपत्यहीन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तिला तिच्या पतीशिवाय दीर्घकाळ राहावे लागेल. वंश वाढविण्यासाठी त्याने पॅरोल मागितला आहे. अशा स्थितीत आरोपींना पंधरा दिवसांच्या पॅरोलवर सोडणे योग्य ठरेल. न्यायालयाने शिक्षा भोगणाऱ्याला कारागृह अधीक्षकांसमोर दोन लाख रुपयांचा मुचलका आणि प्रत्येकी एक लाख रुपयांच्या दोन जामीनदारांना हजर करण्यास सांगितले आहे. याशिवाय, पॅरोल कालावधीनंतर आरोपीची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी तुरुंग अधीक्षक त्यांच्या स्तरावर अट ठेवू शकतात.
पत्नीला गरोदर राहायचे असल्याने पेरोल- याचिकेत अधिवक्ता विश्राम प्रजापती यांनी न्यायालयाला सांगितले की, तो २२ वर्षांचा तरुण आहे आणि पॉक्सो कायद्याच्या गुन्ह्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. संतती वाढवण्यासाठी त्याच्या पत्नीला गरोदर राहायचे आहे. त्यामुळे त्याला पॅरोलवर सोडण्यात यावे. याला विरोध करताना सरकारी वकिलांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या गंभीर गुन्ह्यात आरोपी वीस वर्षांची शिक्षा भोगत आहे. याशिवाय वंश वाढवण्यासाठी पॅरोलच्या नियमात सुटका करण्याची तरतूद नाही. त्यामुळे याचिका फेटाळण्यात यावी.