महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Adil Khan Durrani Rape Case : राखी सावंतचा पती आदिल खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल

म्हैसूरमधील एका विद्यार्थीनीने राखी सावंतचा पती आदिल खानवर बलात्काराचा आरोप केला आहे. तसेच आदिलने माझे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचा आरोपही या विद्यार्थीनीने केला आहे.

Adil Khan Durrani
आदिल खान दुर्रानी

By

Published : Feb 12, 2023, 1:00 PM IST

म्हैसूर (कर्नाटक) :अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी आता आणखी एका अडचणीत सापडला आहे. इराणहून म्हैसूरमध्ये शिकण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीने त्याच्यावर बलात्कार, फसवणूक आणि धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे, म्हैसूरमधील व्हीव्ही पुरम पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी रविवारी या प्रकरणी माहिती दिली.

विद्यार्थीनीशी शारीरिक संबंध ठेवले : आपल्या तक्रारीत विद्यार्थीनीने म्हटले आहे की, 'मी म्हैसूरमध्ये डॉक्टर ऑफ फार्मसीचा अभ्यास करण्यासाठी आले आहे. आदिल खानला मी गेल्या ५ वर्षांपासून ओळखते. तो माझ्याशी लग्न करेल, या विश्वासाने मी त्याच्याशी व्हीव्ही पुरम येथील एका अपार्टमेंटमध्ये शारीरिक संबंध ठेवले. पण तो आता गेल्या पाच महिन्यांपासून लग्नाला नकार देतो आहे. जर मी लग्न करण्याचा आग्रह धरला तर तो माझे खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देतो आहे.

राखी सावंतनेही केली होती तक्रार : काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री राखी सावंत आणि म्हैसूरचा आदिल खान दुर्रानी यांचे लग्न झाले होते. या आधी राखी सावंतने महाराष्ट्रातील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये पती आदिल खान दुर्रानी विरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आदिलला पोलिसांनी अटक केली आहे. आदिलने आईच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत, असा आरोप राखीने केला आहे. राखीने आदिलवर तिची आई जया भेडा यांच्या काळजीचा खर्च चुकवल्याचा आरोप केला आहे. तसेच तिच्या आईच्या मृत्यूला आदिल जबाबदार असल्याचा दावाही राखीने केला होता. राखी सावंतने आदिलवर तिचे पैसे आणि दागिने घेतल्याचा आरोपही केला आहे. राखीने नकळत तिच्या खात्यातून दुर्राणीने कार खरेदी करण्यासाठी 1.5 कोटींहून अधिक रक्कम काढल्याचा आरोपही केला आहे. राखी सावंतने आदिलवर अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. तसेच राखीने आदिल खानवर दुसऱ्या मुलीसोबत एक्सट्रा मटेरियल अफेअरचा आरोपही केला आहे. राखी सावंतने तक्रारीत आरोप केला आहे की, दुर्राणीने तिला एकापेक्षा जास्त वेळा तिच्यावर अ‍ॅसिड हल्याची किंवा समोरासमोर किंवा रस्ता अपघातात तिला ठार मारण्याची धमकी दिली आहे. दुर्राणी याने तिला नमाज अदा करण्यास भाग पाडल्याचा आरोपही राखी सावंतने केला आहे.

हेही वाचा :Naga Sadhu Sivagiribapu Attacked : साध्वी जयश्रीकानंद यांच्यावर तलवारीने हल्ला, नागा साधू शिवगिरीबापूंची तुरुंगात रवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details