महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rape and murder in Rhino World : गेंडेही करतात बलात्कार? नरमादी असंतुलनामुळं गेंड्यांमधील संघर्ष वाढला, वाचा चमत्कारिक सत्य... - जलदापारा राष्ट्रीय उद्यान

Rape and murder in Rhino World : नैसर्गिक आवश्यक प्रमाणापेक्षा गेंड्यांच्या मादींच्या संख्येपेक्षा नरांची संख्या जास्त असल्यानं नरांमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झालाय. हा संघर्ष आता नियमित बनलाय. सर्वसाधारणपणे गेंड्यांच्या लैंगिक सवयींचा विचार केल्यास प्रत्येक नर गेंड्यामागे तीन मादी गेंडे असावेत, असा नैसर्गिक संकेत आहे. दुर्दैवाने, सध्याचे प्रमाण 1:1 आहे. ज्यामुळे या प्राण्यांच्या पुनरुत्पादनासाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी एक गंभीर आव्हान निर्माण झालंय. वाचा ईटीव्ही भारतचे अभिजित बोस यांची अभ्यासपूर्ण बातमी...

Rape and murder in Rhino World
Rape and murder in Rhino World

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 7:32 PM IST

जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) Rape and murder in Rhino World : फेब्रुवारी 2018 मध्ये, कांची नावाच्या एकशिंगी गेंड्याच्या मादीचा अकाली मृत्यू हा गेंड्यांच्या जगात एका भयानक घटनेचा परिणाम असल्याचा संशय होता. तो म्हणजे बलात्कार. पश्चिम बंगालच्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये गेंड्यांच्या नर-मादी असंतुलनाचा धक्कादायक पैलू उघड करणाऱ्या अडीच वर्षांच्या मादी गेंड्याला धुपझोरा येथे जीव गमवावा लागला. कारण तिच्यावर लैंगिक जबरदस्ती झाली होती.

मादीसाठी होत आहेत नर गेंड्यांमध्ये संघर्ष -या उद्यानातीलकांचीच्या नशिबी जे काही घडलं होतं ती काही वेगळी घटना नव्हती. राज्याच्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये या अवाढव्य प्राण्यांच्या जीवनात अशा हिंसाचाराच्या घटना यापूर्वीही घडत आलेल्या आहेत. यापूर्वीही काहीशी अशीच घटना 8 नोव्हेंबर 2017 रोजी घडली होती. धुपझोरा च्या 1B कंपार्टमेंटमध्ये एकाच मादीसाठी स्पर्धा करणाऱ्या दोन नर गेंड्यांमधील भीषण संघर्षात एका तरुण नर गेंड्याचा अंत झाला होता. आपल्या आईजवळ मीलनासाठी जाण्यास दुसऱ्या डॉन नावाच्या गेंड्याला या मृत्यू झालेल्या गेंड्यानं विरोध केला होता. त्यामध्ये या दोन नर गेंड्यांचा संघर्ष झाला. त्यात त्या मादी गेंड्याचे पिलू ठार झाले होते. वन अधिकार्‍यांच्या मते यातील डॉन आणि मादी गेंडा चंचलाच्या वयातील फरक यात कारणीभूत ठरला असावा. कारण ते पिलू आईला सोडायलाच तयार नव्हते. अशा प्रकारे गेंड्यांच्या मृत्यूचे प्रकार एकट्या धुपझोरा राष्ट्रीय उद्यानातच झाले नाहीत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतर राष्ट्रीय उद्यानांमध्येही अशाच प्रकारचे संघर्ष मोठ्या प्रमाणात झाले आहेत. 21 डिसेंबर 2015 रोजी, जलदापारा नॅशनल पार्कच्या वेस्टर्न रेंजमधील होलोंग भागातही दोन नर गेंड्यांमध्ये मादीसाठी असाच संघर्ष झाला होता. त्यातही एका गेंडाचा मृत्यू झाला. जंगलातील एकमेकांच्या हद्दीत घुसल्याने हे संघर्ष होतात. त्याचं मुख्य कारण हे जोडीदाराचा शोध हेच असतं. त्यामुळे अशा संघर्षात गेंड्यांचा मृत्यू होतो, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

गेंड्यांच्या नर-मादी विषम प्रमाणात समस्येचे मूळ - या समस्येचे मूळ कारण नर-मादी गेंड्याच्या विषम गुणोत्तरामध्ये आहे. हे प्रमाण जसे असायला पाहिजे तसे नाही. त्यामध्ये नैसर्गिक प्रमाणाच्या गंभीरपणे विस्कळीतता आहे, असे वन्यजीव तज्ञांचे म्हणणे आहे. नर गेंड्यांची संख्या माद्यांपेक्षा जास्त असल्याने, नरांमधील अंतर्गत संघर्ष आता नित्याचेच झाले आहेत. गेंड्यांच्या नैसर्गिक लैंगिक सवयींचा विचार केल्यास आदर्श परिस्थितीत प्रत्येक नर गेंड्यामागे तीन मादी गेंडे असावेत. मात्र दुर्दैवाने, सध्याचे प्रमाण 1:1 असे आहे. त्यामुळे या प्राण्यांसाठी प्रजनन आणि जगण्याचे संकट निर्माण झाले आहे.

गेंड्याची नैसर्गिक जीवनपद्धती अशी आहे की, एका नर गेंड्याला मीलनासाठी तीन माद्यांची गरज असते. पण तो समतोल इथं अस्तित्वात नाही. परिणामी, प्रजनन पद्धती विस्कळीत होतात. जेव्हा दोन नर एका मादीसाठी लढतात तेव्हा एक नर गेंडा अनेकदा हरतो, मृत्यू होतो. आमची मागणी आहे की, सरकारनं या समस्येकडं शास्त्रोक्त पद्धतीनं बघितलं पाहिजे. - श्यामा प्रसाद पांडे, प्रवक्ते स्पोर स्वयंसेवी संस्था

प्रजनन आणि जगण्याचे संकट -गोरुमारा राष्ट्रीय उद्यान आणि जलदापारा राष्ट्रीय उद्यानात 2022 च्या गेंड्यांच्या गणनेनुसार 89 आणि 216 चौरस किलोमीटरच्या एकत्रित क्षेत्रामध्ये अनुक्रमे 55 आणि 292 गेंडे आहेत. यामध्ये नर आणि मादी दोन्ही समाविष्ट आहेत. 2019 च्या आकडेवारीशी या आकडेवारीची तुलना केल्यास, गेंड्यांच्या संख्येत थोडीशी वाढ झाली आहे. गोरुमारामध्ये, संख्या 52 वरून 55 वर पोहोचली आहे. तर जलदापाराची गेंड्यांची संख्या 237 वरून 292 वर गेली आहे. ही सकारात्मक बाब असूनही, लिंग असमतोल हा एक महत्त्वाचा चिंतेचा विषय आहे, ज्यामुळे पश्चिम बंगालमधील गेंड्यांच्या भविष्यावर नामशेष होण्याचं सावट आहे.

हेही वाचा :

  1. World Suicide Prevention Day २०२३ : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2023; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व...
  2. World physiotherapy Day 2023 : जागतिक फिजिओथेरपी दिवस २०२३; जाणून घ्या काय आहे इतिहास...
  3. World Literacy Day 2023 : जागतिक साक्षरता दिन 2023; जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस...

ABOUT THE AUTHOR

...view details