महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारचा विषयच लय खोल! मुंबईविरुद्ध सामना खेळण्यासाठी पोहोचले दोन संघ अन् झाला राडा

Ranji Match In Patna : पटना येथील मोईनुल हक स्टेडियमवर शुक्रवारी रणजी ट्रॉफीचा एलिट गटाचा सामना खेळला गेला. या सामन्यात मोठ्या प्रमाणावर गोंधल पहायला मिळाला. तिथं बीसीएच्या ओएसडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Ranji Match In Patna
Ranji Match In Patna

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 2:44 PM IST

पाटणा (बिहार) Ranji Match In Patna : बिहार क्रिकेट असोसिएशनमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून रणजी ट्रॉफीच्या एलिट गटाच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात बिहारनं नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67 षटकांत 9 गडी गमावून 235 धावा केल्या. मात्र, या काळात बीसीएला (बिहार क्रिकेट असोसिएशन) चांगलाच फटका बसलाय. कारण बिहारमधून चक्क दोन संघ रणजी चषकाचा सामना खेळण्यासाठी आले होते. यानंतर परिस्थिती थेट हाणामारीपर्यंत पोहोचली.

बीसीएच्या ओएसडीवर प्राणघातक हल्ला : नाणेफेकीपूर्वी बीसीए सचिव गटाचा संघ खेळण्यासाठी आला होता, त्यांना मैदानात प्रवेश करण्यापासून कडकपणे रोखण्यात आले. त्याचवेळी उपस्थित पोलीस दलानं त्यांना त्यांच्याच बसमध्ये बसवून स्टेडियमबाहेर नेलं. यानंतर काही वेळानं बीसीएच्या ओएसडीवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण करुन डोक्यात दगड मारुन जखमी केलं.

मुंबईचे स्टार खेळाडू सामन्यापासून दूर : पाटणा इथं प्रथमच एलिट गटाचा सामना होत आहे. मोईनुल हक स्टेडियमवर सुरु असलेला हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि धवल कुलकर्णी हे क्रिकेट चाहत्यांमध्ये आकर्षणाचे केंद्र राहिले. पण या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे आणि धवल कुलकर्णी खेळत नसल्यामुळं चाहत्यांची निराशा झाली. अजिंक्यच्या जागी शम्स मुलानीकडे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. बिहारला तब्बल 47 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीच्या एलिट गटात खेळताना पाहण्याचं पाटणावासीयांसह संपूर्ण बिहारचं स्वप्न पूर्ण झालं.

सामन्याची स्थिती काय : मुंबईकडून भूपेन लालवानीनं सर्वाधिक 65 धावा केल्या. मात्र तो साकिबुल घनीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. याशिवाय शिवमनं 41 धावांची तर तनुषनं 50 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी मुंबईच्या तीन खेळाडूंना दोन अंकी धावा करता आल्या नाहीत, तर एकालाही खातं न उघडताच परतावं लागलं. बिहारकडून वीर प्रताप सिंगनं चार बळी घेतले. साकिबुल घनी आणि हिमांशू सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर कर्णधार आशुतोष अमननं 10 षटकात 26 धावा देऊन एक विकेट घेतली.

हेही वाचा :

  1. 53 वर्षांचं झालं एकदिवसीय क्रिकेट; आतापर्यंत कसा राहिला एकदिवसीय क्रिकेटचा प्रवास, वाचा सविस्तर
  2. फक्त 642 चेंडू अन् खेळ खल्लास! भारतानं तिसऱ्यांदा दोन दिवसात जिंकला कसोटी सामना, पहिले दोन कोणते?

ABOUT THE AUTHOR

...view details