2023 मध्ये, रंगपंचमीचा सण 12 मार्च रोजी रविवारला साजरा केला जाईल. रंगपंचमी हा सण हिंदू देवतांना समर्पित मानला जातो. विशेषत: भगवान श्री कृष्ण आणि राधिका यांनी वृंदावनात खेळलेली रंगपंचमी अनेक कथांंमधून प्रेमाचा संदेश देत असते. होळीच्या सणानंतर 5 दिवसांनी चैत्र महिन्यातील कृष्ण पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते. विशेषत: मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात रंगपंचमी उत्साहात साजरी केली जाते. तथापि, हा सण देशाच्या इतर भागांमध्येही उत्साहात साजरा केला जातो.
का साजरी करतात 'रंगपंचमी' :होळी हा सण दरवर्षी कृष्ण पक्षातील प्रतिपदेला साजरा केला जातो. त्यानंतर बरोबर पाच दिवसांनी चैत्रमासातील कृष्ण पक्षातील पंचमीला होळी खेळली जाते. ज्याला 'रंगपंचमी' म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार पंचमी तिथीला लोक हवेत गुलाल उडवून देवाला रंग चढवतात. गुलालाची उधळण केल्याने देव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात, असे मानले जाते. हवेत गुलाल आणि रंग उधळण्यासोबतच वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाहते.
रंगपंचमी 2023 शुभ मुहूर्त : वैदिक कॅलेंडरनुसार, रंगपंचमीची तारीख 11 मार्च शनिवार रोजी रात्री 10:06 वाजता सुरू होईल आणि 12 मार्च रविवार रोजी रात्री 10:02 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार रंगपंचमीचा सण १२ मार्चलाच साजरा केला जाणार आहे.
रंगपंचमीच्या दिवशी काय उपाय करावे :वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर, रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधारानी यांची पूजा करा, त्यांना गुलाल अर्पण करा. असे केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता येते असे मानले जाते. यासोबतच वैवाहिक जीवन आनंदी राहील.