रांची (झारखंड) : 'कहो ना प्यार है' या प्रसिद्ध चित्रपटाची अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात रांची सिव्हिल कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. झारखंडचे चित्रपट निर्माते अजय कुमार सिंह यांनी अमिषा पटेल विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ही घटना 2017 सालची आहे. आरोपानुसार, चित्रपट बनवण्याच्या नावाखाली अजयने अमीषा पटेलच्या खात्यात अडीच कोटी रुपये ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर होऊनही अमिषाने चित्रपट बनवला नाही. पैसे मागितल्यावर त्याला अभिनेत्रीने चेक दिला. जो चेक पुढे बाउन्स झाला. त्यानंतर त्यांनी वरील तक्रार केली होती.
दोघांची ओळख : अजय कुमार सिंग हरमू हाउसिंग कॉलनीतील एका कार्यक्रमादरम्यान अमिषा पटेलला भेटले आणि त्यांना चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्याची ऑफर मिळाली. देसी मॅजिक हा चित्रपट बनवण्याच्या नावाखाली त्यांनी अमीषा पटेलच्या खात्यात अडीच कोटी रुपये ट्रान्सफर केले. अजय कुमार सिंग हे लव्हली वर्ल्ड एंटरटेनमेंटचे मालक आहेत. चित्रपट न बनवल्यानंतर आणि पैसे परत न केल्याने अजय कुमार सिंह यांनी कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. अमिषा पटेलने त्यांची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. चित्रपट बनला नसताना त्याचे पैसे परत मिळाले नाहीत.