महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ramoji Film City : 'रामोजी फिल्म सिटी' आहे पर्यटकांना सर्व सुविधा देणारं वन स्टॉप सोल्युशन, एकदा भेट द्याच

Ramoji Film City : नवी दिल्लीत दोन दिवसीय MICE 2023 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. इथं विविध स्टॉल्स लावण्यात आले असून, यापैकी हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीचा स्टॉल लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Ramoji Film City
Ramoji Film City

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 7:18 AM IST

पहा व्हिडिओ

नवी दिल्ली Ramoji Film City :भारत, रशिया आणि इतर देशांमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारपासून दोन दिवसीय MICE 2023 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मॉस्को शहर पर्यटन समितीचे अध्यक्ष इव्हगेनी कोझलोव्ह यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारतीय व्यावसायिक बिझनेस इव्हेंटसाठी मॉस्कोला मोठ्या संख्येनं प्राधान्य देत आहेत.

रामोजी फिल्म सिटीनं स्टॉल लावला : या कार्यक्रमात जगातील सर्वात मोठ्या रामोजी फिल्म सिटीनं देखील एक स्टॉल लावलाय. या स्टॉलला लोकं मोठ्या संख्येनं भेट देत आहेत. गेल्या काही वर्षात रामोजी फिल्म सिटी चित्रपट शूटिंग, विवाह सोहळे, कॉर्पोरेट मीटिंग आणि बिझनेस समिट यासह सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी एक आदर्श ठिकाण म्हणून उदयास आली आहे. फिल्मसिटीमध्ये आतापर्यंत ३,५००० हून अधिक चित्रपटांचं चित्रीकरण झालं असून इथं दरवर्षी ३५० ते ४०० परिषदाही आयोजित केल्या जातात. रामोजी फिल्म सिटीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक (मार्केटिंग) टीआरएल राव यांनी ही माहिती दिली.

वर्षाकाठी सुमारे २० लाख पर्यटक देतातभेट : रामोजी फिल्म सिटीमध्ये दरवर्षी १०० ते १२५ भव्य विवाह सोहळे आयोजित केले जातात. ही फिल्म सिटी पाहण्यासाठी वर्षाकाठी सुमारे २० लाख पर्यटक येतात. या पर्यटकांची फिल्म सिटीच्या विविध हॉटेल्समध्ये सोय केली जाते. तसेच इथल्या वेडिंग प्लॅनर, मेस ऑपरेटर आणि इतर कर्मचारी वर्षभर पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज असतात. या सर्व सोई-सुविधांमुळे इथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. विशेष म्हणजे या फिल्म सिटीची जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील नोंद आहे.

रामोजी फिल्म सिटी वन स्टॉप सोल्युशन : पुढं बोलताना टीआरएल राव यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केलं. 'आम्हाला आमच्या फिल्म सिटीचा प्रचार करण्याची संधी मिळाली, याचा खूप आनंद आहे. त्याचबरोबर रशिया आणि इतर देशांचं पर्यटन समजून घेण्याची आणि तेथील शक्यतांची माहिती घेण्याची संधीही आम्हाला मिळाली. आम्ही या देशांतील लोकांना आमच्या पर्यटन स्थळाबद्दल सांगत आहोत. रामोजी फिल्म सिटी हे पर्यटकांना सर्व सुविधा देणारं वन स्टॉप सोल्युशन आहे', असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

  1. ICC ODI World Cup 2023 Trophy : जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटीत क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी प्रदर्शित, पहा व्हिडिओ
  2. IRCTC चे गोल्डन ट्रँगल टूर पॅकेज, रामोजी फिल्म सिटीसह 'या' ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल

ABOUT THE AUTHOR

...view details