महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ramoji Film City : रामोजी फिल्म सिटीच्या तुऱ्यात आणखी एक मोरपीस, उत्कृष्ट पर्यटन प्रोत्साहनाचा पुरस्कार प्रदान - FTCCI

रामोजी फिल्म सिटीने सोमवारी फेडरेशन ऑफ तेलंगणा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FTCCI) द्वारे दिला जाणारा उत्कृष्टता पुरस्कार मिळवून आणखी एक सन्मान मिळवला आहे.

Ramoji Film City
Ramoji Film City

By

Published : Jul 3, 2023, 9:25 PM IST

Updated : Jul 3, 2023, 10:39 PM IST

उत्कृष्ट पर्यटन प्रोत्साहनाचा पुरस्कार

हैदराबाद : आपल्या फेट्यामध्ये आणखी तुरा खोवत, रामोजी फिल्म सिटीने सोमवारी फेडरेशन ऑफ तेलंगणा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FTCCI), तेलंगणाची सर्वोच्च व्यापार आणि उद्योग संस्था यांनी स्थापन केलेला उत्कृष्टता पुरस्कार जिंकला आहे. रामोजी फिल्मसिटीला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये आता या पुरस्काराची भर पडली आहे.

रामोजी फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक विजयेश्वरी यांना हैदराबाद येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात तेलंगणा सरकारचे उद्योग आणि आयटी मंत्री के. टी. रामाराव यांच्याकडून पर्यटन प्रोत्साहनातील उत्कृष्टतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या माध्यमातून रामोजी फिल्मसिटीचा शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून परिवर्तनशील प्रवास तसेच नाविन्य आणि वाढीसाठीच्या बांधिलकीला मान्यता मिळाल्याचे दिसून येते. FTCCI ही संस्था 106 वर्षे जुनी आहे आणि भारतातील सर्वात गतिमान प्रादेशिक चेंबर्सपैकी एक आहे.

ज्या संस्था प्रमुख्याने कॉर्पोरेट, संस्था आणि उद्योजकांमध्ये उत्कृष्ट कार्य करतात त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ही संस्था सन्मन करते. FTCCI संस्थेकडेा एकूण 22 प्रकारांमध्ये सुमारे 150 अर्ज सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या पारितोषिकासाठी आले होते. तसेच वर्षातील सर्वोत्कृष्ट स्टार्ट-अप पुरस्कारासह 23 प्रकारांमध्येही संस्थेच्या मार्फत नामांकन मागविण्यात आले होते.

रामोजी फिल्म सिटीने अलीकडच्या काळात जिंकलेल्या अनेक पुरस्कारांपैकी आजचा हा पुरस्कार होता. डिसेंबरमध्ये, RFC ला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून अन्न सुरक्षेतील उच्च-स्तरीय मानके राखण्यासाठी प्रतिष्ठित 'इट राइट कॅम्पस पुरस्कार' मिळाला आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सद्वारे जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून रामोजी फिल्मसिटी नावाजली आणि ओळखली जाते. रामोजी फिल्म सिटी हे चित्रपट निर्मात्यांचे नंदनवन आणि सुट्टी घालवणाऱ्यांसाठी स्वप्नवत ठिकाण आहे. भव्य 2000 एकरमध्ये पसरलेले, एक प्रकारचे चित्रपट-प्रेरित थीमॅटिक पर्यटन स्थळ त्याच्या उत्कृष्ट उपक्रमासाठी ओळखले जाते. दरवर्षी, सुमारे 200 फिल्म युनिट्स त्यांची सेल्युलॉइड स्वप्ने साकार करण्यासाठी फिल्मसिटीमध्ये येतात. रामोजी फिल्म सिटीमध्ये जवळपास सर्व भारतीय भाषांमधील 2500 हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे.

Last Updated : Jul 3, 2023, 10:39 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details