अयोध्या - अयोध्येत प्रथमच भगवान रामासाठी खास 21 किलो चांदीचा झोपाळा बसवण्यात आला आहे. शुक्ल पक्ष पंचमीपासून राम मंदिरात राम यांचा सावन झुला उत्सव सुरू होईल. रामललाच्या दरबारात सावन झुला उत्सव साजरा करण्याची ही पहिलीच वेळ असेल. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राने ट्वीट करून ही माहिती दिली.
श्री रामजन्मभूमी संकुलात श्रावण महिन्याच्या पंचमी तारखेपासून सावन झुला (श्रावण झोपाळा) सणाची परंपरा आहे. मात्र, अयोध्येतील सर्व मठ मंदिरांमध्ये तृतीयेपासूनच सावन झुला उत्सव सुरू झाला आहे. रामजन्मभूमीतही पंचमीपासून श्री रामललाचा झुलनोत्सव साजरा केला जाईल. ज्यासाठी चांदीचा झोपाळा आणला गेला आहे, असे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले.