महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ramayana And Gita In PG Courses : आता मध्य प्रदेशातील कॉलेजात शिकवली जाणार रामायण आणि गीता! - पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये रामायण आणि गीता

मध्य प्रदेशात आता पीजी अभ्यासक्रमात रामायण आणि गीता शिकवली जाणार असून, पुस्तकांमध्ये महापुरुषांच्या जीवनातील कथाही असतील. (ramayana and gita in pg courses in mp). राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव (mp minister mohan yadav) यांनी खांडवा येथे ही माहिती दिली.

Ramayana And Gita
रामायण आणि गीता

By

Published : Jan 2, 2023, 9:45 PM IST

उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव

खांडवा (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव (mp minister mohan yadav) यांनी रविवारी एक मोठी घोषणा केली आहे. आता मध्य प्रदेशातील पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये रामायण आणि गीता शिकवल्या जातील. (ramayana and gita in pg courses in mp). यासोबतच त्यांनी सांगितले की, येत्या १२ जानेवारीला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान युवा धोरण जाहीर करतील. (mp youth policy).

तरुणांसाठी युवा धोरण : उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी सर्किट हाऊस येथे भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतली. येथे आमदार देवेंद्र वर्मा, आमदार नारायण पटेल, महापौर अमृता यादव आणि इतर वरिष्ठ नेत्यांनीही यादव यांची भेट घेतली, यादरम्यान त्यांनी मीडियाशीही संवाद साधला. म्हणाले की, "12 जानेवारीला एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यातील तरुणांसाठी युवा धोरण जाहीर करतील".

महाविद्यालयांमध्ये गीता आणि रामायणाचा अभ्यासक्रम : यासोबतच उच्च शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण धोरणाबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "पीजी वर्गाच्या अभ्यासक्रमाची रचनाही केली जात आहे. अपेक्षा आहे की ते या वर्षी लागू होईल. दुसऱ्या वर्षानंतर तिसऱ्या वर्षाचे शैक्षणिक धोरणही आपल्या अभ्यासक्रमाचा भाग बनत आहे. या अभ्यासक्रमात रामायण, गीता आणि महापुरुषांची चरित्रेही समाविष्ट करणार आहोत. विभागात जवळपास 4 हजार पदांची भरती केली जाणार आहे. 2000 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उर्वरित पदांसाठीही लवकरच जाहिरात दिली जाईल."

ABOUT THE AUTHOR

...view details