महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ram Navami 2023 : काय आहे रामनवमीचा इतिहास, का साजरी करण्यात येते रामनवमी - हिंदू धर्म

भगवान प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत झाला होता. त्यामुळे देशभरात चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी साजरी करण्यात येते. या वर्षी रामनवमी ३० मार्चला साजरी करण्यात येत आहे.

Ram Navami 2023
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 27, 2023, 11:20 AM IST

Updated : Mar 30, 2023, 6:29 AM IST

हैदराबाद :रावणाच्या अत्याचारापासून मुक्ती देण्यासाठी भगवान विष्णूंनी पृथ्वी तलावर प्रभू रामाचा जन्म घेतल्याची अख्यायीका आहे. प्रभू रामांचा जन्म अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीला झाला. तेव्हापासून राम नवमीचा उत्सव हिंदू धर्मीयांमध्ये साजरा करण्यात येतो. भगवान रामांचा जन्म दशरथाच्या कौशल्या या राणींच्या पोटी झाल्यानंतर हा उत्सव अयोध्येतून सुरू झाला. या वर्षी रामनवमी ३० मार्चला देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जाणून घेऊया, काय आहे रामनवमीचा इतिहास, त्याचे महत्व आदी विषयाची सविस्तर माहिती.

का झाला प्रभू श्रीरामांचा जन्म :भगवान राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार असल्याचे वाल्मिकी यांच्या रामायण या ग्रथांत नमूद करण्यात आले आहे. रावणांच्या त्रासाला कंटाळून अनेक ऋषी मुनी वैतागले होते. ऋषी मुनी करत असलेल्या यज्ञांत दानवांकडून संकटे आणली जात होती. त्यामुळे भगवान विष्णूंनी राम अवतार घेत रावणाचा संहार केल्याची अख्यायिका रामायणात नमूद करण्यात आली आहे. या दिवशी देशभरातील नागरिक रामचरित्र मानस या ग्रंथाचे पठन करतात. त्यासह रामनवमीच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. भगवान श्रीरामांचा जन्म या दिवशी झाल्याने नागरिक मोठ्या भक्तीभावाने श्रीरामांची मूर्ती पाळण्यात ठेऊन त्यांची पूजा केली जाते.

काय आहे इतिहास : भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करुन हिंदू धर्मावर होण्याऱ्या अन्यायाचा नाश केला. मात्र याबाबतची मोठी रंजक कथा रामायणात वर्णन करण्यात आली आहे. अयोध्येचा राजा दशरथ यांना तीन राण्या असूनही त्यांना मूल नव्हते. त्यामुळे राजा दशरथ मोठे नैराश्यात होते. याबाबत वशिष्ठ ऋषींनी त्यांना पुत्रकामेष्टि यज्ञ करण्याची सूचना दिली. त्यामुळे राजा दशरथांनी पुत्रकामेष्टि यज्ञ केला. या यज्ञातून प्रकट झालेल्या दिव्य पुरुषाने राजा दशरथ यांना खीर दिली. ही खीर महर्षि ऋष्यश्रृंग यांनी राजा दशरथ यांच्या तिन्ही राण्यांना ही खीर खाण्यासाठी दिली. त्यामुळे राजा दशरथ यांच्या मोठ्या राणीच्या पोटी रामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत झाला. तर राणी कैकईने भरताला आणि राणी सुमित्रा यांनी लक्ष्मण व शत्रुघ्न या दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्याची अख्यायीका रामायणात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी चैत्र शुक्ल नवमीला देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.

हिंदू धर्मीय नागरिक अशी करतात प्रभू रामांची पूजा :चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत प्रभू श्रीरामांचा जन्म झाल्याने हिंदू धर्मीय नागरिक या दिवशी अयोध्येला जातात. अयोध्येतील शरयू नदीत स्वच्छ अंघोळ करुन नागरिक अर्घ्य वाहतात. प्रभू श्रीरामांचा जन्म मध्यरात्री झाल्याचे रामायण या वाल्मीकींनी लिहिलेल्या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक अयोध्येत दुपारी प्रभू श्रीरामांची पूजा करुन अर्घ्य वाहतात. प्रभू श्रीरामांला प्रदक्षिणा करतात. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी धर्माचे रक्षण केल्याने देशभर प्रभू श्रीरामांची पूजा करण्यात येते. देशभरात रामचरित मानस या ग्रंथाचे वाचनही करण्यात येते.

हेही वाचा - World Theatre Day 2023 : जाणून घ्या का साजरा करण्यात येतो जागतिक रंगभूमी दिन, काय आहे इतिहास

Last Updated : Mar 30, 2023, 6:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details