महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ram Mandir : '1 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर तयार होईल', अमित शाहंची त्रिपुरात घोषणा - अयोध्येतील राम मंदिर

त्रिपुरात एका सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले (Amit Shah in Tripura), '2019 च्या निवडणुकी दरम्यान राहुल गांधी म्हणाले होते, 'मंदिर वही बनायेंगे..तारीख नही बातायेंगे', मात्र आज त्यांनी ऐकले पाहिजे की 1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत लोकांसाठी एक विशाल राम मंदिर तयार होईल'. (Ram Mandir Inauguration). (Amit Shah on Ram Mandir).

Amit Shah on Ram Mandir
अमित शाह राम मंदिर

By

Published : Jan 5, 2023, 8:28 PM IST

दक्षिण त्रिपुरा (त्रिपुरा) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राहुल गांधींच्या "तारीख नही बातायेंगे" या वाक्याची खिल्ली उडवताना अयोध्येतील राम मंदिर 1 जानेवारी 2024 रोजी तयार होईल, अशी घोषणा केली. (Amit Shah on Ram Mandir). दक्षिण त्रिपुरामध्ये एका सभेला संबोधित करताना शाह म्हणाले (Amit Shah in Tripura), 'काँग्रेसने राम मंदिराच्या उभारणीसाठी कोर्टात अडथळा निर्णाण केला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मोदीजींनी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी भूमीपूजन केले आणि बांधकामाला सुरुवात केली.' (Ram Mandir Inauguration).

मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू : अमित शाह पुढे म्हणाले, '2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी म्हणाले होते, 'मंदिर वही बनायेंगे..तारीख नही बातायेंगे', मात्र आज राहुल गांधी आणि प्रत्येकाने ऐकले पाहिजे की 1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत लोकांसाठी एक विशाल राम मंदिर तयार होईल'. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीची पायाभरणी केली आणि तेव्हापासून मंदिराचे बांधकाम सुरू आहे.

सर्वानुमते मंदिराच्या बाजूने निकाल : भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई (आता निवृत्त) यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वानुमते राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. अयोध्येत जिथे एकेकाळी बाबरी मशीद उभी होती ती जमीन राम लल्लाची आहे, असे निकालात म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details