अयोध्या Ram Mandir Pran Pratishtha : राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा अभिषेक करण्यासाठी आता केवळ काही दिवस उरले आहेत. मंगळवारपासून सहा दिवस धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज राम मंदिरात विधीचा तिसरा दिवस आहे. आज रामलल्लाच्या मूर्तीला स्नान करण्यात येणार आहे. विविध विधीदेखील पार पडणार आहेत. हे विधी वाराणसीच्या वैदिक महंतांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहेत. 21 जानेवारी हा धार्मिक विधी करण्याचा शेवटचा दिवस आहे.
राम लल्ला गर्भगृहात होणार विराजमान :रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जवळ येत असल्यानं रामभक्तांना मोठा आनंद होत आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या धार्मिक विधीमुळे रामभक्तांमध्ये देशभरात उत्साह संचारला आहे. आज सायंकाळी तीर्थपूजा, जलयात्रा, जलाधिवास, गंधविवास, असा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. राम लल्लाच्या मूर्तीला आज पवित्र स्नान करण्यात येणार आहे. संध्याकाळी राम लल्लाच्या मूर्तीवर सुगंधित द्रवपदार्थ लावण्यात येणार आहेत. त्यानंतर शुभ मुहूर्तावर रामलल्ला मदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार आहे.