महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काळ्या कृषी कायद्यांप्रमाणेच नरेंद्र मोदी हे भारतासाठी काळे- राकेश टिकैत यांची खोचक टीका - राकेश टिकैत

कृषीच्या तीन नवीन कायद्यांना विरोध राकेश टिकैत यांनी वर्षभरापासून आंदोलन सुरू ठेवले आहे. जोपर्यंत सरकार चर्चा करणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. त्यासाठी काही वर्षे गेली तरी चालेल, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

राकेश टिकैत
राकेश टिकैत

By

Published : Oct 13, 2021, 9:06 PM IST

लखनौ- शेतकरी कायदे हे शेतकऱ्यांसाठी 'काला' (निराशाजनक) आहेत. त्याचप्रमाणे मोदी हे कंलक असल्याची टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. किसान युनियनद्वारा आयोजित सामूहिक विवाह कार्यक्रमानिमित्त बाराबंकमध्ये आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

लखीमपूर (Lakheempur) प्रकरणात मंत्रीपुत्र आशिष मिश्राला रेड कार्पेट टाकून अटक करण्यात आले. तर फुलांचे गुच्छ देऊन चौकशी केली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना अटक व बरखास्त करेपर्यंत लखीमपूर शेतकरी हत्याकांडावर आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी किसान युनियनकडून 26 ऑक्टोबरला महापंचायतचे आयोजन करण्यात येणार आहे.

जोपर्यंत सरकार चर्चा करणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार

हेही वाचा-सुरक्षा दलाला मोठे यश! त्रालमधील चकमकीत जैश कमांडरला कंठस्नान

तिन्ही कृषी कायद्यांवर स्थगिती नको, कायदे मागे घ्यावे

कृषीच्या तीन नवीन कायद्यांना विरोध राकेश टिकैत यांनी वर्षभरापासून आंदोलन सुरू ठेवले आहे. जोपर्यंत सरकार चर्चा करणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. त्यासाठी काही वर्षे गेली तरी चालेल. सरकारने कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे. तर आंदोलनाचे कारण काय, असे विचारले असता टिकैत म्हणाले, स्थगिती नको. कृषी कायदे मागे घ्यावेत.

काळ्या कृषी कायद्यांप्रमाणेच नरेंद्र मोदी हे भारतासाठी काळे

हेही वाचा-नियमांचा भंग करत समुद्रकिनारी बेकायदा रस्त्याची निर्मिती, रस्त्यावर भाजपचे वृक्षारोपण

एमएसपी लागू न झाल्याने सरकारकडून स्वस्तात धान्य खरेदी सुरू
राकेश टिकैत म्हणाले, की हजार-बाराशे रुपयांनी धान खरेदी करून सरकार शेतकऱ्यांच्या घरात लूट करत आहे. सरकारला उद्योगपती आणि मोठ्या व्यापाऱ्यांचा फायदा करायचा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना धान स्वस्तात खरेदी केले जात आहे. सरकारकडून नवीन कृषी कायदे मागे घेतले जातील, असा विश्वासही टिकैत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-ड्रॅगनचे फुत्कारे! उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडुंच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनचा आक्षेप

ABOUT THE AUTHOR

...view details