नवी दिल्ली :संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत येत्या 13 मार्च रोजी पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांचा हा महत्वाचा दौरा समजला जात आहे.
टिकैत यांचा दौरा महत्वाचा
पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान राकेश टिकैत एका महापंचायतला संबोधित करणार आहेत. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या टिकैत यांचा हा महत्वाचा दौरा असणार आहे. दिल्लीतील आंदोलनासोबतच देशभरातील विविध राज्यांना भेटी देऊन तिथल्या नागरिकांना आंदोलनाचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न आता शेतकरी नेत्यांकडून केला जात आहे. याच रणनितीचा भाग म्हणून टिकैत देशातील काही राज्यांचा दौरा करणार आहेत. त्यांचा पश्चिम बंगाल दौराही याच रणनितीचा एक भाग आहे.