भरतपूर -गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज करौलीमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सभा घेतली. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशातील सर्व शेतकरी एकत्र आहेत. शेतकरी सभांच्या माध्यमातून आंदोलनाला गती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण घेत नसून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द केले. तर शेतकऱ्यांना फायदा होईल. एमएसपीवर कायदा नाही. त्यामुळे मोठ्या कंपन्या स्वस्तात मालाची खरेदी करतील आणि साठेबाजी करतील. तोच शेतकऱ्यांकडून स्वस्तात घेतलेला माल मोठ्या दरात विकतील, असे टिकैत म्हणाले.
देशाला स्वतंत्र करण्यासाठीची लढा 90 वर्षे चालला. परंतु आमचा लढा केवळ 30 ते 35 वर्षाचा आहे. हा लढा जास्त दिवस चालणार आहे. हा लढा भारत सरकारच्या धोरणाविरोधात आहे. हा कोणत्याही विशिष्ट पक्षाविरुद्धचा लढा नाही. ही एक वैचारिक क्रांती आहे आणि विचाराने सुरु झालेली क्रांती ही विचारावरच संपते. ही क्रांती लाठ्या आणि बंदुकीने संपणार नाही, असे टिकैत म्हणाले.