उधमपूर ( जम्मू काश्मीर ) : जिथे भाजपचे सरकार नाही तिथे द्वेषाचे राजकारण भाजप करत आहे. भाजपला देशात द्वेष पसरवायचा आहे. भाजपवाले हे दिसताना पूजापाठ करणारे दिसतात, मात्र हे तर बळी प्रथा असणारे आहेत. महाराष्ट्रात शिवसेना त्यांच्या सोबत असती तर शिवसेना त्यांच्यासाठी चांगली असती, ( Rakesh Tikait On Maharashtra Political Crisis ) अशा शब्दात शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी भाजपवर निशाणा ( Rakesh Tikait Criticized BJP ) साधला.
उधमपूरला पोहोचलेले शेतकरी नेते राकेश तिकेत म्हणाले की, सरकार द्वेष पसरवून मते मागते. जनतेला मात्र बंधुभाव हवा आहे पण, सरकारला तोडफोड करायची आहे. काही झाले तर त्याला पाकिस्तान जबाबदार आहे, असे सांगितले जाते. मात्र हा देश, संविधान असलेला आहे. ज्याने खून केला असेल त्याला शिक्षा होईल.