महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी बड्या हिंदु नेत्याची हत्या होईल- राकेश टिकैत यांचा दावा - BJP

शेतकरी नेता टिकैत म्हणाले, की भाजपसारखा दुसरा कोणताही धोकादायक पक्ष नाही. ज्यांनी भाजपची स्थापना केली, त्या नेत्यांना आज घरात कैद करण्यात आले आहे.

राकेश टिकैत
राकेश टिकैत

By

Published : Sep 1, 2021, 7:43 PM IST

Updated : Sep 1, 2021, 7:50 PM IST

लखनौ- केंद्र सरकारविरोधात तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपसारखा कोणताही धोकादायक पक्ष नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी बड्या हिंदु नेत्याची हत्या होऊ शकते, असा दावा टिकैत यांनी केला आहे.

हरियाणाच्या सिरसामध्ये शेतकरी मेळाव्यात भारतीय किसान युनियनचे नेता राकेश टिकैत पोहोचले. यावेळी त्यांनी भाजप सरकावर गंभीर आरोप केले आहे. टिकैत म्हणाले, की उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी मोठ्या भाजप नेत्याची हत्या होऊ शकते. त्यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोठ्या हिंदू नेत्याची हत्या करून हिंदू-मुस्लिम वाद करून भाजपला निवडणूक जिंकण्याची इच्छा आहे.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी बड्या हिंदु नेत्याची हत्या होईल

हेही वाचा-गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सल्ला

भारतावर सरकारी तालिबानींनी ताबा-

शेतकरी नेता टिकैत म्हणाले, की भाजपसारखा दुसरा कोणताही धोकादायक पक्ष नाही. ज्यांनी भाजपची स्थापना केली, त्या नेत्यांना आज घरात कैद करण्यात आले आहे. भारतावर सरकारी तालिबानींनी ताबा घेतला आहे. ज्या एसडीएम अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर काठ्या मारण्याचे आदेश दिले, त्याचे काका राष्ट्रीय स्वंयसेवक संघात मोठ्या पदावर आहेत. या सरकारी तालिबानींचा पहिला कमांडर करनालमध्ये आढळला आहे. जर हे आम्हाला खलिस्तानी म्हणत असतील तर त्यांना आम्ही तालिबानी म्हणू.

हेही वाचा-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज घेणार राज्यपालांची भेट, 12 आमदारांचा प्रश्न सुटणार?

शेतकऱ्यांवर दुजाभाव होत असल्याची टीका-

राकेश टिकैत म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे. मात्र, तसे झाले नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भावही मिळाला नाही. यावेळी टिकैत यांनी सरकारी धोरणावरही टीका केली. मोठ्या कंपन्यांची कर्ज माफ करण्यात येत आहे. त्याच मोठ्या कंपन्या सरकारी संस्थांची खरेदी करत आहे. मात्र, जर शेतकऱ्याने कर्ज फेडले नाही तर, त्याचे घर, जमीन आदी संपत्तीचा लिलाव करण्यात येतो. कर्ज 10 लाखांचे असले तरी शेतकऱ्याची 50 लाखांची जमीन विकली जाते. हा कोणता कायदा आहे? हे धोरण तयार करत असताना तिथे कोणीही ट्रॅक्टर अथवा नांगर चालविणारे नाही.

हेही वाचा-मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट, राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी असणार उपस्थित

Last Updated : Sep 1, 2021, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details