नवी दिल्ली -गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. हजारो शेतकरी आंदोलक सिंघु, टिकरी, गाजीपूर आदी बॉर्डवरच थांबले आहेत. शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत गाझीपूर सीमेवर साफ-सफाई करताना आढळले. बैरिकेडच्या आसपास त्यांनी सफाई केली. ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तिथे थोडाही कचरा पडू देणार नाही. सर्व ठिकाणे स्वच्छ ठेवण्यात येतील, असे ते म्हणाले.
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. हे शेतकरी आंदोलन महात्मा गांधी यांची जयंती अर्थात 2 ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा राकेश टिकैत यांनी केली आहे. 2 ऑक्टोंबरनंतर आम्ही पुढील योजना जाहीर करू. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत मागे हटणार नाही, असे ते म्हणाले. कृषी कायदे रद्द केल्यानंतर आंदोलक शेतकरी आपल्या घरी परततील असं टिकैत यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं.
खिळे ठोकलेल्या जागेवरच लावली फुलं -