नवी दिल्ली - संसदेच्या अधिवेशनात अशोभनीय वर्तवणूक करणाऱ्या खासदारांमुळे राज्यसभेचे पावित्र्य भंग (sacrilege in Parliament) होते, असे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले, की संसदेच्या खासदारांची असभ्य वागणूक आहे.
राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले, की संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हटले जाते. खासदारांच्या वागणुकीबाबद सभापतींनी दु:ख व्यक्त केले. राज्य सभेचे सभापती म्हणून निष्पक्ष भूमिका आहे. सरकारचा बचाव करत नाही. मात्र, घटनात्मक जबाबदारीही आहे. संसदेच्चा कामकाजातील दस्तावेज पाहिले तर लक्षात येते, की अनेकदा नाव पुकारूनही खासदारांनी चर्चेत भाग घेतला नाही. अशावेळी सभापती राज्यसभेच्या सदस्यांना बोलण्यासाठी आग्रह करू शकत नाहीत.
हेही वाचा-Parliament Winter Session :कृषी कायदे मागे घेण्यास लोकसभेची मंजुरी, गदारोळातच निर्णय
नायडू यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज सुरू होताच खासदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी ( Venkaiah Naidu 12 Rajya Sabha MPs suspension ) फेटाळली आहे. सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले, की राज्यसभेच्या समितीने खासदारांचे निलंबन रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. निलंबित खासदारांना वागणुकीबाबत कोणताही पश्चाताप नाही. अशा परिस्थितीत राज्यसभेच्या खासदारांचे निलंबन मागे घेतले जाणार नाही.
हेही वाचा-Winter Session of Parliament : विरोधकांचा गोंधळ; लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत स्थगित