महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

New Tripura CM Manik Saha : डॉ माणिक साहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री - New Tripura CM Manik Saha

बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहाच्या नावासह अनेक नावांची चर्चा होती. अखेर सर्व नेत्यांनी साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी ( BJP legislature party Tripuara ) निवड केली. माणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष ( Tripura BJP president ) आहेत. ते राज्यसभेचे खासदारही आहेत.

Dr Manik Saha
डॉ माणिक साहा

By

Published : May 14, 2022, 7:45 PM IST

आगरतळा - त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. डॉ. माणिक साहा हे नवे ( Dr Manik Saha New CM Tripura ) मुख्यमंत्री असणार आहेत. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी ( Biplab Kumar Deb Regine ) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहाच्या नावासह अनेक नावांची चर्चा होती. अखेर सर्व नेत्यांनी साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी ( BJP legislature party Tripuara ) निवड केली. माणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष ( Tripura BJP president ) आहेत. ते राज्यसभेचे खासदारही आहेत.

भाजप नेत्यांनी पक्ष सोडण्याचे वाढले प्रमाण-निवडणुकीच्या अवघ्या वर्षभरापूर्वी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत पक्षाने त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरातील भाजप नेत्यांनी पक्ष सोडण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामागील कारणही बिप्लब देब हे असल्याचे सांगितले जात होते.

2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी-यापूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी शनिवारी राजभवनात राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बिप्लब देब म्हणाले, 'संघटनेच्या हितासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पक्षाचा निर्णय महत्त्वाचा आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. पक्ष हायकमांडने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. आता 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करायची आहे.

हेही वाचा-Tripura CM resigns : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचा राजीनामा; 'ही' आहे भाजपची व्युहनीती

हेही वाचा-Asaduddin Owaisi on Muslim Vote Bank : भारतात कधीही मुस्लिम व्होट बँक नव्हती, ती कधीच असणार नाही - असदुद्दीन ओवेसी

हेही वाचा-Video Ruthlessness of Ambulance driver : रुग्णवाहिकेची दुचाकींना धडक, अपघातामधील जखमींशी निर्दयी वागून चालकाचा पळ

ABOUT THE AUTHOR

...view details