महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सभागृहात गोंधळ घातल्याने तृणमूलच्या सहा खासदारांचे एका दिवसासाठी निलंबन - TMC MP

पेगासस हेरगिरी, कोरोना आणि कृषी कायद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक प्रचंड गदारोळ घालत आहेत. बुधवारी या मुद्यांवरुन तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातला, त्यामुळे सभापतींनी राज्यसभेच्या 6 खासदारांवर एका दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली.

Six TMC MPs suspended
तृणमूलच्या सहा खासदारांचे एका दिवसासाठी निलंबन

By

Published : Aug 5, 2021, 7:42 AM IST

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरू झाले आहे. मात्र, काही विधेयके सोडली, तर राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण कामकाज झालेले नाही. पेगासस आणि शेतकरी आंदोलनावरून विरोधक संसदेत हंगामा करत आहेत. यामुळे संसदेचे कामकाज बाधित होत आहे. बुधवारी दोन्ही सभागृहात विरोधी खासदारांनी गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली. गोंधळ घातल्याबद्दल तृणमूल काँग्रेसच्या सहा खासदारांना उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिवसभराच्या कारवाईतून निलंबित केले.

टीएमसीचे निलंबित झालेले खासदार.

तृणमूल खासदार डोला सेन (Dola Sen), नदीमुल हक (Nadimul Haque) अर्पिता घोष (Arpita Ghosh), मौसम नूर (Mausam Noor), शांता छेत्री (Shanta Chhetri) आणि अबीर रंजन बिस्वास (Abir Ranjan Biswas) अशी निलंबित झालेल्या खासदारांची नावे आहेत. सभापतींच्या आसानासमोर येत फलक दाखवत घोषणाबाजी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सहा खासदारांना निलंबित केले.

राज्यसभेत बुधवारी विरोधी सदस्य पेगाससच्या मुद्द्यावर घोषणा देत होते. तेव्हा सभापतींनी सदस्यांना त्यांच्या जागेवर जाण्याचे निर्देश दिले. परंतु विरोधी सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावर नायडू यांनी तृणमूल काँग्रेसच्या सहा खासदारांना नियम 255 अंतर्गत सभागृहाच्या उर्वरित कामकाजापासून निलंबित केले. बुधवारी गोंधळाच्या स्थितीत लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक विधेयक मंजूर केले आणि त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

संसदेत विरोधकांच्या मुद्द्यावर चर्चा नाही -

संसदेत वाढत्या गदारोळासाठी विरोधकांनी सरकारच्या उद्दामपणाला जबाबदार धरले. संसदेत पेगासस आणि कृषी कायद्यांवरील चर्चेची मागणी मान्य करण्याचा सरकारला आग्रहही केला आहे. काँग्रेसने गृहमंत्री अमित शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, असे म्हटलं. गेल्या दिवसांमध्ये सात ते आठ विधेयके मंजूर केली आहेत. मात्र, मुद्यांवर चर्चा होत नसल्याचे विरोधी पक्ष अस्वस्थ झाले आहेत. म्हणूनच लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात विरोधी वृत्ती अधिक तीव्र होत आहे. सरकार पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार झाल्यानंतरच संसदेतील गोंधळ संपेल, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. तर हा कळीचा मुद्दा नसल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी लोकसभेत म्हटलं. तर संसदेचे सत्र 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा -Monsoon Session Updates : विरोधकांना पाहिजे काय? हे त्यांनाच स्पष्ट माहिती नाही - केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर

हेही वाचा -संसदेत नुसता गोंधळ; दोन्ही सभागृहात 107 तासांपैकी केवळ 18 तास झाले काम

ABOUT THE AUTHOR

...view details