महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Congress MP Rajani Patil : राज्यसभा समितीने अहवाल सादर न केल्याने रजनी पाटील यांचे निलंबन कायम - रजनी पाटील यांचे झालेले निलंबन कायम राहणार

राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील यांचे झालेले निलंबन कायम राहणार असल्याचे सभापती जगदीप धनकड यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसभा समितीने या विषयावरी अहवाल सादर न केल्याने हे निलंबन कायम राहणार आहे असही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Congress MP Rajani Patil
Congress MP Rajani Patil

By

Published : Apr 6, 2023, 4:00 PM IST

Updated : Apr 6, 2023, 5:23 PM IST

नवी दिल्ली : काही दिवसांपुर्वी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांचे वरिष्ठ सभागृहातून (राज्यसभेतून) निलंबन करण्यात आले आहे. त्यावर आता हे निलंबन कायम राहणार आहे असे सांगण्यात आले आहे. यावर राज्यसभा समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत हे निलंबन कायम राहील असे सभापती धनकड यांनी जाहीर केले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

रजनी पाटील काय म्हणाल्या होत्या : मी स्वातंत्र्य सेनानींच्या घरातून येते. त्यामुळे जर माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल तर त्याचा इतका बाऊ करण्याची गरज नव्हती. हा विषय काढून काढून भाजपच्या लोकांनी मला अपमानित करण्याचं काम केलं आहे. असं रजनी पाटील त्यावेळी म्हणाल्या होत्या. त्यावर राज्यसभेत गदारोळ सुरु झाला होता. भाजपच्या खासदारांनी पाटील यांच्या या वक्तव्याला विरोध करत गदारोळ घातला होता. दरम्यान, काँग्रेसकडूनही त्याला प्रत्त्युत्तर देण्यात आले होते.

काय म्हणाले होते राज्यसभेचे सभापती :राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर म्हणाले होते की, आज ट्विटरवर, या सभागृहाच्या कार्यवाहीशी संबंधित व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. मी त्याचा गांभीर्याने विचार केला आणि आवश्यक ते सर्व केले आहे. तत्त्वानुसार आणि संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी कोणत्याही बाहेरील एजन्सीचा सभागृहाच्या कामकाजात सहभाग मागता येणार नाही, त्यामुळे रजनी पाटील यांना निलंबित करण्यात येत आहे अस ते त्यावेळी म्हणाले होते.

जेष्ठांशी संवाद साधून घेतला होता निलंबनाचा निर्णय :हा विषय सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित असल्याने आमच्याकडे प्राथमिक साहित्य होते. मी ज्या ज्येष्ठ सदस्यांशी संवाद साधला त्यांची नावे मी सांगणार नाही. पण मी त्यांना माझ्या चेंबरमध्ये बोलावून मार्गदर्शन मागितले की अशी परिस्थिती उद्भवल्यास मार्ग काय असावा, त्यानंतर निलंबनाचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही धनकड यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले. दरम्यान, रजनी पाटील यांना निलंबित केल्यानंतर राज्यसभेत काहीसा गोंधळ पाहावयास मिळाला होता. ही कारवाई चुकीची असल्याचे सांगत काँग्रेस खासदारांनी कारवाईला विरोध केला होता.

मंत्री पियुष गोयल काय म्हणाले होते : पियुष गोयल म्हणाले होते की, परवा एक दुर्दैवी घटना घडली आहे. असे आढळून आले आहे की, सोशल मीडियावर आम्ही या गौरवशाली सभागृहात रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाहत आहोत. ज्यामध्ये संसदेच्या ज्येष्ठ सदस्यांचे अनधिकृतपणे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे होते. हे रेकॉर्डिंग सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित आणि वितरित केले गेले आहे. हे चुकीचे आहे, असेही मंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले होते. मला वाटते की, कोणत्याही सदस्याने केलेली अशी कोणतीही कृती अत्यंत गंभीर चिंतेची बाब आहे. या घटनेबाबत खासदारांनी यापूर्वीही आपल्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी आणि तपासणी करण्याची विनंती केली होती.

हेही वाचा :BJP Foundation Day: जगातील सर्वात मोठ्या भाजप पक्षासह इतर 10 टॉप पक्ष कोणते?, वाचा सविस्तर

Last Updated : Apr 6, 2023, 5:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details