नवी दिल्ली -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आसियानच्या बैठकीस उपस्थित होते. आसियान देशांच्या संरक्षण मंत्र्यांची ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. आज सकाळी 6.30 वाजता बैठक झाली. एडीएमएम प्लस हे एक महत्त्वपूर्ण मंच आहे. यात 10 आसियान सदस्य देश आणि आठ संवाद भागीदार म्हणजे ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, रशिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे. ही बैठक ब्रुनेई संरक्षण मंत्रालयाने आयोजित केली होती. यावर्षी ब्रुनेई आसियान गटाचे अध्यक्ष आहेत आणि सर्व बैठकींचे आयोजन ब्रनेईकडून करण्यात येत आहे.
या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यसह चीन, जपान, रशिया आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव उपस्थित होते. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा वातावरणाबद्दल भारताची मते आणि दृष्टीकोन व्यक्त करण्याची संधी मिळाल्याबद्दल एडीएमएम प्लस फोरमचे आभार राजनाथ सिंग मानले. वेगाने पसरणाऱ्या आणि रूप बदलणाऱ्या कोरोनाचे संकट सध्या आपल्यासमोर आहे, असे राजनाथ म्हणाले.
भारत-इंडो-पॅसिफिकवर भाष्य -