नवी दिल्ली -डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ने ( DRDO fast work in Bengaluru ) बंगळुरू येथील एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE) येथे फ्लाइट कंट्रोल सिस्टमसाठी अत्युच्च तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानामुळे डीआरडीओने केवळ 45 दिवसांत सातमजली इमारत ( 7 storey complex built in 45 days ) बांधली आहे.
सात मजली इमारतीत भारतीय हवाई दलासाठी पाचव्या पिढीचे ( fifth generation fighter aircraft program ), मध्यम वजनाचे, सखोल मारा करणारे लढाऊ विमान विकसित करण्यासाठी ( Medium Combat Aircraft ) संशोधन आणि विकास ( R&D ) सुविधा असणार आहेत. त्यामध्ये हायब्रीडच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ते म्हणाले की, प्रगत मध्यम लढाऊ विमान (AMCA) प्रकल्पांतर्गत लढाऊ विमाने आणि फ्लाइट कंट्रोल सिस्टमसाठी ( Flight Control System ) एव्हीओनिक्स विकसित करण्याची सुविधा या कॉम्प्लेक्समध्ये असेल.
हेही वाचा-Pune : मुलीला त्रास देतो म्हणून महिलेकडून युवकाला दांडक्याने मारहाण, युवकाचा मृत्यू
केंद्रीय संरक्षण मंत्री आज करणार उद्घाटन
भारत पाचव्या पिढीच्या (प्रगत मध्यम लढाऊ विमानाची 5वी पिढी) प्रगत स्टेल्थ वैशिष्ट्यांसह मध्यम वजनाचे, खोल-श्रेणीचे लढाऊ विमान विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी एएमसीए ( AMCA ) प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पाचा प्रारंभिक विकास खर्च अंदाजे 15,000 कोटी रुपये आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Defence Minister Rajnath Singh i) आज या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.
हेही वाचा-Sanjay Raut On The Kashmir Files : 'त्यांना आता काश्मीर आठवलं, इतकी वर्षे हे कुठं होते ?' राऊतांचा सवाल
सात मजली इमारतीचे बांधकाम 45 दिवसांत पूर्ण करण्याचा विक्रम-
अधिकाऱ्याने माहिती दिली की एमसीए प्रकल्प आणि संबंधित उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही इमारत बांधण्यात आली आहे. त्यासाठी सर्वांगीण बांधकाम तंत्राचा वापर करून किमान ४५ दिवसांच्या कालावधीत बांधकाम पूर्ण करण्यात आले. 22 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, संकरित बांधकाम तंत्रज्ञानासह कायमस्वरूपी आणि पूर्णतः कार्यरत असलेल्या सात मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचा हा एक अनोखा विक्रम आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
The Kashmir Files : राजीव गांधी काश्मिरी पंडितांच्या बाजूने अन् भाजप रथयात्रेत व्यस्त; काँग्रेसचा घणाघात