महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rajnath Singh : भारत जोडो यात्रेवरून राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी भारज जोडो यात्रेवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. कुठ भारत तुटला आहे असे म्हणत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह भारत जोडो यात्रेवरच जोरदार टीका केली आहे. राजनाथ सिंह हे आज रविवार (दि. 22 जानेवारी)रोजी मध्य प्रदेशातील सिंगरौली जाहीर सभेत बोलत होते.

Rajnath Singh
राजनाथ सिंह

By

Published : Jan 22, 2023, 10:17 PM IST

राजनाथ सिंह कार्यक्रमात बोलताना

नवी दिल्ली :भारत जोडो यात्रेसाठी निघालेल्या लोकांना भारत एक करायचा आहे. परंतु, मला विचारायचे आहे की भारत तुटतोय का? भारत कुठे तुटला नाही. तुटला असा म्हणाल तर तो एकदाच म्हणजे(1947)ला भारत देश तुटला. भारताचे दोन भाग झाले. त्यानंतर भारत कुठे तुटला आहे असा प्रश्न उपस्थित करत सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत फिरताना सांगत आहेत की भारतात द्वेष आहे. यांना कुठे द्वेश दिसतोय असे म्हणत काँग्रेसचे लोक जगात देशाचा अपमान करत आहेत असा घणाघात राजनाथ सिंह यांनी यावेळी केला आहे.

देशात विकास :देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. पूर्वी आम्ही इतर देशांकडून युद्ध विमाने, क्षेपणास्त्रे, युद्धनौका आणि बॉम्बसह इतर गोष्टी आयात करायचो. परंतु, आता आम्ही सर्व काही भारतातच बनवण्याचे काम केले आहे. तसेच, आम्ही आता संरक्षण सामग्रीचीही निर्यात करत आहोत. असे म्हणत भारत विकासाच्या मार्गावर आहे असे राजनाथ सिंह यावेळी सांगत होत.

शिवराज सिंह यांचे केले कौतुक :या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी शिवराज सिंह यांचे कौतुक केले. आज मुख्यमंत्र्यांनी भूखंड वाटप योजनेंतर्गत २७,००० हून अधिक कुटुंबांना जमिनीचे वाटप केले आहे. मुख्यमंत्री गरिबांच्या हितासाठी कटिबद्ध नसते तर हे काम झाले नसते. दरम्यान, नेत्यांनी प्रलोभने देऊन जनतेचा पाठिंबा मिळवला आहे, असे म्हणत राजनाथ यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

गुणवंत मुलांना शिकवण्याचे शुल्क सरकार भरणार : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, आज 421 एकर जमीन राज्यातील गरिबांमध्ये वाटली जात आहे, हा सामाजिक न्याय आहे. ते म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन दिले जात आहे. आता गुणवंत मुलांच्या शिक्षणाची फी सरकार भरणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे त्यांच्या मुलांची फी सरकार भरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा :अमित शाहांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, राहुल गांधी यांना न्यायालयाची नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details