नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोरोनाची ( Rajnath Singh Corona Positive ) लागण झाली आहे. यासंदर्भातली माहिती त्यांनी ( Rajnath Singh Tweet On Corona ) ट्विट करून दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
काय म्हणाले राजनाथ सिंह -
'माझी कोविड चाचणी पॉजिटिव आली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी स्वत:ला होम क्वारंटीन केले आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.', असे ट्वीट राजनाथ सिंह यांनी केले आहे. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी 6 जानेवारी रोजी उत्तराखंड येथे एक निवडणूक रॅली केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा -PM security breach : न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली होणार पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रृटीची चौकशी