नवी दिल्ली:Rajiv Gandhi Foundation: राजीव गांधी फाउंडेशनला चिनी दूतावासाकडून १.३५ कोटी रुपये मिळाले आहेत. हे एफसीआरए नियमांनुसार नसल्याने फाउंडेशनची नोंदणी रद्द केली Rajiv Gandhi Foundation registration cancelled असल्याची माहिती गृहमंत्री अमित शाह HM Amit Shah यांनी दिली. संसदेत ते बोलत होते.
Rajiv Gandhi Foundation: राजीव गांधी फाऊंडेशनला चिनी दूतावासाकडून मिळाले पैसे.. मान्यता रद्द : अमित शाह - राजीव गांधी फाउंडेशनची मान्यता रद्द
Rajiv Gandhi Foundation: राजीव गांधी फाउंडेशनला चिनी दूतावासाकडून १.३५ कोटी रुपये मिळाले आहेत. हे एफसीआरए नियमांनुसार नसल्याने फाउंडेशनची नोंदणी रद्द केली Rajiv Gandhi Foundation registration cancelled असल्याची माहिती गृहमंत्री अमित शाह HM Amit Shah यांनी दिली.
गांधी कुटुंबीयांमार्फत चालवण्यात येणाऱ्या राजीव गांधी फाऊंडेशन आणि इंदिरा गांधी ट्रस्ट यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केंद्र सरकारमार्फत करण्यात आली आहे. या ट्रस्टवर देशाबाहेरून येणाऱ्या देणग्यासंबंधी नियमावली मोडल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. तसेच यामध्ये मनी लाँडरींगचा देखील समावेश असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंत्रिमंडळाचे विशेष पथक स्थापन केले होते.
अनेक कायदेशीर बाबींचे उल्लंघन केल्याचे समोर आल्याने संबंधित कारवाई करत असल्याचे गृह खात्याच्या वतीने यापूर्वीच सांगण्यात आले होते. प्राप्तीकर कायद्यातील तरतुदींचे देखील उल्लंघन केल्याचा संशय आहे. यामध्ये राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट चा समावेश आहे.