हैदराबाद : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत ( Superstar Rajinikanth ) रूबाब आजही टिकून आहे. रजनीकांत यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि त्यांचे चाहते नेहमी थलैवाच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दरम्यान, रजनीकांत यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली आहे. रजनीकांत यांची मुलगी आणि दिग्दर्शिका ऐश्वर्या रजनीकांत यांनी शनिवारी (५ नोव्हेंबर) तिच्या नवीन चित्रपट 'लाल सलाम'ची ( Rajnikant in lal salam ) घोषणा केली आहे. यावेळी चित्रपटाचे पहिले पोस्टरही शेअर करण्यात आले आहे. या चित्रपटात ऐश्वर्याने वडील रजनीकांत यांना खास भूमिका दिली आहे.
रजनीकांत यांची मुलगी करणार दिग्दर्शन -लायका प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी स्वत: करत आहे. यासोबतच चित्रपटात रजनीकांत यांच्याबद्दलही मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुलगी ऐश्वर्याच्या या चित्रपटात रजनीकांत स्पेशल अपिअरन्स देताना दिसणार आहेत.