महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nandini Gupta Famina Miss India : राजस्थानची १९ वर्षीय नंदिनी गुप्ता ठरली फेमिना मिस इंडिया - फेमिना मिस इंडिया राजस्थान कोटा

कोटा येथील नंदिनी गुप्ता ही फेमिना मिस इंडिया स्पर्धेत विजेती ठरली आहे. तिची फेमिना मिस इंडिया म्हणून निवड झाली आहे. नंदिनी फेमिना मिस इंडिया बनल्यानंतर तिचे कुटुंब खूप आनंदी झाले आहे.

नंदिनी गुप्ता ठरली फेमिना मिस इंडिया
Nandini Gupta Famina Miss India

By

Published : Apr 16, 2023, 9:42 AM IST

जयपूर: कोटाची नंदिनी गुप्ता मणिपूर येथील इंफाळ येथे झालेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत विजेती ठरली आहे. तिचे आई-वडील आणि लहान बहीण अजूनही तिच्यासोबत मणिपूरमध्ये आहेत. तर नंदिनी आपल्या कुटुंबासह रामपुरा भागातील जुन्या भाजी मंडईत राहते. तिचे वडील सुमित गुप्ता हे देखील बिल्डर आहेत. तिची धाकटी बहीण अनन्याही शिक्षण घेत आहे.

कुटुंबासमवेत नंदिनी गुप्ता

नंदिनीचे मुंबईतून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज शिक्षण सुरू आहे. कोटा येथूनच माला रोड येथील मिशनरी स्कूलमधून तिने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. यात नंदनीच्या संपूर्ण कुटुंबाने तिला मदत करत प्रेरित केले. नंदिनी गुप्ताचे वडील सुमित गुप्ता म्हणाले, की गेल्या ४५ दिवसांपासून ही स्पर्धा सातत्याने सुरू आहे. मणिपूरच्या पर्यटन विभागाने स्पर्धेचे आयोजन केले होते. शनिवारी रात्री स्पर्धेचा निकाल लागून नंदिनी विजेती ठरली आहे. ती पुढच्या वर्षी मिस युनिव्हर्ससाठीचा सहभाग घेणार आहे.लहानपणापासून तिने कोणतेही क्लास आणि ट्रेनिंग घेतले नाही.तिचा संपूर्ण कुटुंबाला त्याचा अभिमान आहे. वयाच्या 10 ते 12 व्या वर्षी कोणताही निर्णय घेतला तरी त्यात भाग घ्यायचाच असा ठाम इरादा तिने केला. नंदिनीला यश मिळाले. तिची आई रेखा गुप्ताही खूप खुश आहे.

नंदिनी गुप्ता मंचावर

चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला तर...नंदिनीने फेमिना मिस इंडियासारख्या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध केले आहे. लहानपणापासून तिला कॅटवॉक आणि टीव्हीवरील सौंदर्यस्पर्धेचे कार्यक्रम आवडायचे. त्यासाठी तिने सातत्याने मेहनतही घेतली. जर तिला चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला तर ती नक्कीच अभिनय करणार आहे.फेमिना मिस इंडिया बनणे ही फक्त सुरुवात आहे. आता यानंतर तिचे मिस युनिव्हर्स बनण्याचे स्वप्न आहे. नंदिनी सांगते की ब्रँडचा प्रचार असो किंवा ब्रँड अॅम्बेसेडर बनणे किंवा चित्रपटांमध्ये करिअर करणे असो, सर्वांचे लक्ष तिच्यावर असते. कारण आधी ती फक्त फेमिना मिस इंडियाची स्पर्धक होती. पण आता ती फेमिना मिस इंडिया झाली आहे. नंदिनी 11 फेब्रुवारीलाच मिस राजस्थान झाली होती.

हेही वाचा-Atiq And Ashraf Ahmed Shot Dead : अतिक-अशरफची ऑन कॅमेरा गोळ्या झाडून हत्या, पत्रकार भासवून आले होते हल्लेखोर

ABOUT THE AUTHOR

...view details