महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानात विषारी दारू प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू - राजस्थानमध्ये विषारी दारू पिल्याने सात जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशात विषारी दारू पिऊन २० जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच राजस्थानातही विषारी दारु पिऊन ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

विषारी दारू
विषारी दारू

By

Published : Jan 14, 2021, 1:11 PM IST

जयपूर - मध्यप्रदेशात विषारी दारू पिऊन २० जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच राजस्थानातही विषारी दारु पिऊन ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरतपूर जिल्ह्यातील चक सिमरी गावात ही घटना घडली. काही जण जखमी असल्याची माहिती मिळत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून कारवाई सुरू -

राजस्थानात विषारी दारू प्यायल्याने ७ जणांचा मृत्यू

बुधवारी ही घटना घडली होती. सुरूवातील दोन व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यानंतर आणखी व्यक्ती दारू प्यायल्याने आजारी पडले. त्यांनाही उपचारासाठी हलवण्यात आले होते. जिल्हाधिकारी आणि मंत्री महेश जोशी यांनी उत्पादन शुल्क विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने तपास सुरू केला आहे.

मृतांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. भरतपूर जिल्ह्यातील आरबीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चक सीमरी गावात दारुचा अवैध धंदा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र, काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

मध्यप्रदेशात २० जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात विषारी दारू पिऊन २० जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ही घटना घडली होती. संपूर्ण राज्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details