महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

RR vs KKR : चहलची हॅटट्रिक! राजस्थान रॉयल्सकडून कोलकाताचा ७ धावांनी पराभव - श्रेयस अय्यर ipl

राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals ) कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders ) 7 धावांनी पराभव केला. राजस्थानचा हा चौथा विजय आहे. त्याचबरोबर केकेआरचा हा चौथा पराभव आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम खेळताना 20 षटकांत 5 बाद 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ 19.4 षटकांत सर्वबाद 210 धावांवर आटोपला.

राजस्थान रॉयल्सकडून कोलकाताचा ७ धावांनी पराभव
राजस्थान रॉयल्सकडून कोलकाताचा ७ धावांनी पराभव

By

Published : Apr 19, 2022, 6:57 AM IST

मुंबई - आयपीएल (2022)च्या 30 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals ) कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders ) 10 धावांनी पराभव केला. राजस्थानचा हा चौथा विजय आहे. त्याचबरोबर केकेआरचा हा चौथा पराभव आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम खेळताना 20 षटकांत 5 बाद 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ 19.4 षटकांत सर्वबाद 210 धावांवर आटोपला. अनेक चढ-उतार असलेल्या या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत थरार कायम होता. तत्पूर्वी, राजस्थानने पहिल्या डावातच मॅचविनिंग स्कोअर केल्याचे दिसत होते. पण श्रेयस अय्यर आणि अॅरॉन फिंचच्या शानदार फलंदाजीने केकेआरच्या बाजूने सामना फिरवला.

पहिल्याच चेंडूवर सुनिल नरेन तंबूत परतला - त्यानंतर 17व्या षटकात युझवेंद्र चहलने हॅट्ट्रिकसह एकूण चार विकेट घेत राजस्थानचा विजय निश्चित केला होता. मात्र, त्यानंतर उमेश यादवने सामन्याची दिशाच उलटवली. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. उमेशने अवघ्या 9 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 21 धावा केल्या. २१८ धावांच्या मजबूत आव्हानाचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या केकआरची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सुनिल नरेन भोपळाही न फोडता तंबूत परतला.

आश्विनने रसेलला शुन्यावर त्रिफळाचीत केले - फिंचने २८ चेंडूत ५८ धावा केल्या त्यामध्ये ९ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. श्रेयस अय्यरने ५१ चेंडूत ८५ धावा केल्या. त्यामध्ये सात चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने ४० धावा देऊन पाच विकेट घेतल्या व केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. आश्विनने रसेलला शुन्यावर त्रिफळाचीत करून विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला.

चहलने पॅट कमिन्सला यष्टिरक्षक सॅमसनकरवी झेलबाद केले - युजवेंद्र चहलने १७व्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने एका षटकात हॅट्ट्रिकसह चार बळी घेतले. त्याने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यरला यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी त्रिफळाचीत केले. यानंतर चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यर झेलबाद झाला. त्याने 51 चेंडूत 85 धावा केल्या. त्यात सात चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. यानंतर पाचव्या चेंडूवर चहलने शिवम मावीला रियान परागकरवी झेलबाद केले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चहलने पॅट कमिन्सला यष्टिरक्षक सॅमसनकरवी झेलबाद केले.

हेही वाचा -जहांगीरपुरी हिंसाचारात भाजप अन् त्यांच्या काही संघटनांचा हात; शरद पवार यांचा गंभीर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details