जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका पतीने कर्जाची परतफेड करण्यासाठी चक्क आपल्या पत्नीलाच कर्ज देणाऱ्यांच्या हवाली केले! या प्रकरणी महिलेने पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कर्ज फेडण्यासाठी पत्नीला कर्जदारांच्या हवाली केले : जयपूरमधील झोटवाडा पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेने आपल्या पतीवर बलात्कार केल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने कर्ज फेडण्यासाठी तिला कर्ज देणाऱ्यांच्या हवाली केले. पीडितेने झोटवाडा पोलिस ठाण्यात पतीसह, त्याचा मोठा भाऊ आणि नंदेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
पतीला दारूचे व्यसन आहे : झोटवाडा पोलिस स्टेशनचे अधिकारी घनश्याम सिंह राठोड यांनी सांगितले की, 'पीडित महिलेने शुक्रवारी तक्रार नोंदवली. तिने सांगितले की तिच्या पतीला दारूचे व्यसन आहे आणि तो कोणताही व्यवसाय करत नाही. त्याने अनेकांकडून कर्ज घेतले आहे. कर्ज फेडण्यासाठी पतीने तिला कर्ज देणाऱ्यांच्या हवाली करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे'. दारूच्या नशेत असलेल्या पतीने तिला त्याच्या मोठ्या भावासोबतही शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याच्यावर मोठ्या भावाचे दीड लाखांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी तो तिच्यावर बलात्कार नेहमी बलात्कार करायचा.
घर सोडण्याचा प्रयत्न केला असता हल्ला केला : पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीने त्याच्या बहिणीच्या नवऱ्याकडूनही कर्ज घेतले होते. संधी मिळताच त्यानेही तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता. महिलेच्या पतीने तिला नशा मिसळलेले कोल्ड्रिंक दिले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. याचा फायदा घेत त्याने बलात्कार केला. पीडितेने आरोप केला आहे की, जेव्हा तिने पतीचे घर सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्यावर हल्ला करण्यात आला. शेवटी वैतागलेल्या महिलेने झोटवाडा पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. सध्या झोटवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा :
- MP Rape Case : मंदिरातील कर्मचाऱ्यांचे राक्षसी कृत्य!, बलात्कार केला आणि प्रायव्हेट पार्टमध्ये...
- Crime News : 'माझी बायको दहशतवादी आहे', पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीची अजब युक्ती!
- Crime News : 'असे कृत्य फक्त पशूच करू शकतो', 4 वर्षांच्या मुलीवर अमानुष बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा