झुंझुनू (राजस्थान) Rajendra Singh Gudha :राजस्थानमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात निवडणुकीचं बिगुल अद्याप वाजलं नसलं तरी सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कॉंग्रेसचे बडे नेते राजेंद्रसिंह गुढा यांनी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
राजेंद्रसिंह गुढा यांचा शिवसेनेत प्रवेश सरकारमधून हकालपट्टी झाली आहे : राजेंद्रसिंह गुढा यांनी त्यांचा मुलगा शिवम गुढा याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला. ते आधी बहुजन समाज पक्षात होते. राजेंद्रसिंह गुढा उदयपूरमधून दोनदा आमदार राहिले आहेत. राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, स्पीकरसमोर वादग्रस्त लाल डायरी फिरवल्याप्रकरणी त्यांची सरकारमधून हकालपट्टी करण्यात आली होती.
राजेंद्रसिंह गुढा यांचा शिवसेनेत प्रवेश सत्तेची आसक्ती सोडून जनहिताला महत्त्व दिलं : यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्रसिंह गुढा यांचं शिवसेनेत स्वागत केलं. 'ज्याप्रमाणे मी सत्तेला महत्त्व न देता जनहिताला महत्त्व दिलं आणि महाराष्ट्रात जनतेसमोर आदर्श ठेवला. त्याच धर्तीवर राजस्थानमध्ये राजेंद्रसिंह यांनी सत्तेची आसक्ती सोडून जनहिताला महत्त्व दिलं. राजस्थानमधील जनतेचा मूड जाणून घेतल्यानंतर आगामी निवडणुकीसाठी उमेदवार ठरवू', असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यात शिवसेनेची ताकद वाढेल : राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. मात्र भाजपा काँग्रेसकडून ही सत्ता हिसकावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. त्यामुळे राजेंद्रसिंह गुढा यांची पक्षातील एक्झिट कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानली जातीय. शिवसेनेचे राजस्थान प्रभारी चंद्रराज सिंघवी यांनी शुक्रवारी 'X' वर पोस्ट करून सांगितलं होतं की, 'गुढा उद्या म्हणजेच ९ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करतील. राजेंद्र गुढा यांच्या आगमनानं राज्यात शिवसेनेची ताकद वाढेल', असं सिंघवी म्हणाले होते.
कोण आहेत राजेंद्रसिंह गुढा : माजी मंत्री राजेंद्रसिंह गुढा हे राजस्थान कॉंग्रेसमधील बडा चेहरा आहेत. मात्र ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. काही दिवसांपूर्वी गुढा यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. 'माता सीता अतिशय सुंदर होती. तिच्या सौंदर्यामुळे प्रभू राम आणि रावणासारखे अद्भुत लोकही तिच्या मागे वेडे झाले होते', असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं होतं. राजेंद्रसिंह गुढा इथेच थांबले नाहीत. त्यांनी स्वतःची तुलना सीतेशी करत, 'माझ्या या गुणांमुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलटसारखे नेते माझ्यामागे धावत आहेत', असं ते म्हणाले होते.
राजेंद्रसिंह गुढा यांची आत्तापर्यंतची वादग्रस्त विधानं :
- १७ एप्रिल २०२३ - आईचं दूध पिलं असेल तर सचिन पायलट यांच्यावर कारवाई करून दाखवा.
- २३ नोव्हेंबर २०२२ - पायलट यांना अभिमन्यूसारखं कटात अडकवलं. लवकरच बदल घडेल.
- २४ नोव्हेंबर २०२१ -हेमा मालिनी आता म्हातारी झाल्या. आम्ही कतरिना कैफच्या गालासारखे रस्ते बनवणार.
- २५ नोव्हेंबर २०२१ - बायकोच्या मृत्यूनंतरही लोक दोन वेळा दाढी करतात. बायको देवाच्या घरी गेली असेल तर सकाळ-संध्याकाळ दाढी करून काय फायदा.
हेही वाचा :
- Sachin Pilot On Amit Malviya : भाजपा आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांना सचिन पायलट यांनी पाडले खोटे, वाचा काय दिला पुरावा...
- PM Modi Rajasthan Visit : राजस्थानमध्ये कमळच उमलणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी